-
‘बाहुबली’सारखा अजरामर आणि तिकीटबारीवर दणक्यात कमाई करणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस .राजामौली पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवण्यासाठी तयार आहेत.
-
राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
-
करोनामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे.
-
तरी चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता पहायला मिळतेय.
-
प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं असलं तरी या चित्रपटाची सध्या ऑनलाइन आणि ऑफलाइन चर्चा सुरु असल्याचं चित्र दिसत आहे.
-
‘आरआरआर’या चित्रपटाची चर्चा त्याच्या ट्रेलर लॉन्चपासूनच सुरुय.
-
सध्या या चित्रपटाची टीम वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जाऊन चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसतेय.
-
सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु असून अनेक ठिकाणी या चित्रपटांमधील कलाकार दिग्दर्शकांसोबत हजेरी लावताना दिसतायत.
-
राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणेच युनिक म्हणजेच वेगळा आहे.
-
‘आरआरआर’ हा एक बिग बजेट चित्रपट असून यामध्ये तगडी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.
-
‘आरआरआर’मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणबरोबरच ज्यूनिअर एनटीआरही झळकणार आहे.
-
याशिवाय ‘आरआरआर’मध्ये हिंदी चित्रपट सृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्टबरोबरच अजय देवगणही महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत.
-
या सर्व कलाकारांना या चित्रपटासाठी मोठी रक्कम मानधन म्हणून देण्यात आलीय. या कलाकारांना किती रक्कम मिळालीय पाहूयात…
-
‘आरआरआर’मध्ये अजय देवगण प्रमुख भूमिका साकारणार आहे. सध्या अजय प्रमोशन करताना दिसत नसला तरी तो चित्रपटाच्या मुख्य कथेतील महत्वाचं पात्र साकारतोय.
-
अजय देवगण या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकणार आहे.
-
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अजय देवगणला २५ कोटी मानधन देण्यात आलं आहे.
-
‘आरआरआर’मध्ये अभिनेत्री आलिया भट्ट प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे.
-
आलियाने या चित्रपटामध्ये सीतेची भूमिका साकारलीय.
-
या चित्रपटासाठी आलियाने नऊ कोटी रुपये मानधन घेतल्याचं सांगितलं जात आहे.
-
या चित्रपटात ज्यूनिअर एनटीआरही प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
-
ज्यूनिअर एनटीआरने साकारलेल्या भूमिकेचं नाव कोमाराम भीम असं आहे.
-
या चित्रपटासाठी ज्यूनिअर एनटीआरला ४५ कोटी मानधन देण्यात आलं आहे.
-
अभिनेता रामचरण या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे.
-
या चित्रपाटील रामचरणने साकारलेल्या पात्राचं नाव अल्लूरी सीताराम राजू असं आहे.
-
रामचरणचे वेगवेगळे लूक चांगलेच चर्चेत आहेत.
-
प्रथम दर्शनी हा चित्रपट एकाच वेळी तीन वेगवेगळ्या कथा सांगणारा असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. एका कथेट रामचरणने प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारलीय.
-
रामचरणचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
-
या चित्रपटासाठी रामचरणला ४५ कोटींचं मानधन देण्यात आलं आहे. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

Rahul Gandhi : राहुल गांधींची एस. जयशंकर यांच्यावर टीका; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, “यामुळे आपण किती विमाने गमावली?”