-
‘सीआयडी’, ‘अवंतिका’, ‘कुमकुम’ या मालिकांमधून अभिनयामुळे प्रसिद्धी मिळवून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे.
-
श्वेता पडद्यावर सध्या दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
नुकतंच श्वेताने फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये श्वेताने लाल रंगाची भरजरी साडी परिधान करून बंगाली महिलांप्रमाणे पेहराव केला आहे.
-
साजशृंगार आणि मेकअपमध्ये श्वेताचं सौंदर्य खुलून दिसत आहे.
-
तिच्या मोहक अदांनी या फोटोशूटला चार चांद लावून चाहत्यांना घायाळ केलं आहे.
-
या फोटोंना श्वेताने बंगालीमध्ये ‘शुवो शोकाल’ असं कॅप्शन दिलं आहे. याचा अर्थ मराठीत ‘शुभ प्रभात’ असा होतो.
-
श्वेता अभिनयापासून दूर असली तरी निर्मिती क्षेत्रात ती कार्यरत आहे. ‘वज्र प्रोडक्शन’ ही निर्मिती कंपनी तिने २०१६ मध्ये सुरु केली.
-
वज्र प्रोडक्शनद्वारे ‘लागीर झालं जी’, ‘देवमाणूस’, ‘मिसेस मुख्यमंत्री’, ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकांची निर्मिती करण्यात आली आहे.

Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस