-
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेला दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
-
मुंबईतील माफियांच्या टोळीत असलेल्या गंगूबाईच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात गंगूबाईंची भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटातील ‘मेरी जान’ हे गाणं रिलीज झालं आहे.
-
या गाण्यात आलियासोबत अभिनेता शांतनू माहेश्वरी स्क्रीन शेअर करताना दिसत आहे.
-
‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटातून अभिनेता शांतनू माहेश्वरी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
-
शांतनू माहेश्वरी हा केवळ अभिनेताच नाही तर उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर देखील आहे.
-
शांतनूने छोट्या पडद्यापासून त्याच्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली.
-
२०११ साली ‘दिल दोस्ती डान्स’ या चॅनेल व्ही वाहिनीवरील मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.
-
नंतर शांतनू अनेक टीव्ही रिऍलिटी शोमध्ये सुद्धा दिसला होता.
-
‘खतरो के खिलाडी’ या रिऍलिटी शोच्या आठव्या सीझनचा तो विजेता ठरला होता.
-
तर ‘नच बलिये’ या रिऍलिटी शोच्या नवव्या सीझनचा शांतनू रनर अप होता.
-
आंतरराष्ट्रीय रिऍलिटी शो ‘वर्ल्ड ऑफ डान्स’ चे विजेते ठरलेल्या ‘देशी हॉपर्स’ या ग्रुपचा देखील तो भाग होता.
-
‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटात शांतनू ‘रमणिक लाल’ हे पात्र साकारताना दिसणार आहे.
-
या चित्रपटातील ‘मेरी जान’ गाण्यात शांतनू आलियासोबत कारमध्ये रोमान्स करताना दिसत आहे.
-
शांतनू माहेश्वरीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
-
(सर्व फोटो : शांतनू माहेश्वरी/ इन्स्टाग्राम)

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”