-
‘फुलपाखरू’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.
-
दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत हृताने १८ मे रोजी लग्नगाठ बांधली.
-
हृता-प्रतीकच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
हृताने मालिकांसोबतच नाटकांमध्येही काम केलं आहे.
-
प्रतीक शाह हे छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव आहे.
-
प्रतीकने ‘बेहद २’, ‘एक दिवाना था’, ‘तेरी मेरी एक जिंदगी’ यासारख्या लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.
-
प्रतीक लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे.
-
मुग्धा यांनी अनेक मराठीसोबतच हिंदी आणि गुजराती मालिकांमध्ये काम केले आहे.
-
मुग्धा यांनी ‘बे दुणे साडे चार’, ‘मिस मॅच’, ‘कर्तव्य’, ‘माहेर माझं पंढरपूर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
हिंदी मालिकाविश्वातही त्यांचं नाव आहे.
-
‘एनी टाइम मनी’, ‘पोछो मेरे दिलसे’, ‘गुनाह’ या हिंदी चित्रपटांतही त्या दिसल्या होत्या.
-
याशिवाय गुजराती मालिकांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
मुग्धा यांच्याप्रमाणेच प्रतीकही कलाविश्वात नाव कमवत आहे.
-
प्रतीक आईसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
-
(सर्व फोटो : प्रतीक शाह /इन्स्टाग्राम)

Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य; “ठाकरे-पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न, पण मी लिहून देतो…”