-
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या ‘शमशेरा’ या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
-
चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये ‘शमशेराब’द्दल उत्सुकता होती.
-
‘शमशेरा’ चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरला.
-
रणबीर कपूर सोबतच अभिनेता संजय दत्त, अभिनेत्री वाणी कपूर चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
-
‘शमशेरा’ चित्रपट २२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
बॉलिवूड सेलिब्रिटींची तगडी स्टार कास्ट असलेल्या ‘शमशेरा’मध्ये एक मराठमोळा अभिनेताही रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
-
लोकप्रिय अभिनेते सुनील गोडसे ‘शमशेरा’ चित्रपटात दिसणार आहेत. पोस्ट शेअर करत त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
-
त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
सुनील गोडसेंनी अनेक मालिका, चित्रपटांतून काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
‘राजा शिवछत्रपती’ मालिकेतील त्यांनी साकारलेली शाहिस्तेखानाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
-
मराठीसोबतच हिंदी मालिका आणि चित्रपटातंही त्यांनी काम केलं आहे.
-
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रानबाझार’ वेब सीरिजमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
-
सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत ते दादासाहेबांच्या भूमिकेत आहेत.
-
(सर्व फोटो : सुनिल गोडसे इन्स्टाग्राम)

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”