-
बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते.
-
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले. त्यांनी सोशल मीडियावर याबाबतची गुडन्यूज दिली होती.
-
बाळाची गुडन्यूज दिल्यानंतर सर्वजण प्रियांका-निकच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
सध्या प्रियांका आणि निक हे त्यांच्या सहा महिन्याच्या मुलीसोबत पिकनिक एन्जॉय करत आहेत.
-
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या बाळाची सध्या सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.
-
नुकतंच एका मुलाखतीत निक जोनसला पालक झाल्यानंतरचा अनुभव विचारण्यात आला.
-
यावेळी निक जोनस म्हणाला, “आई-वडील झाल्यानंतर प्रत्येकाचे आयुष्य बदलते ही गोष्ट माझ्याबाबतीतही तंतोतंत खरी आहे.”
-
“माझ्या मुलीच्या येण्याने माझेही आयुष्य खरोखरच बदलले आहे. मालती खरंच खूप गोड आहे. तिला पाहिल्यावर मला खूप आनंद होतो”, असे निक जोनसने म्हटले.
-
यावेळी त्याला प्रियांकाच्या गोल्फ खेळातील आवडीनिवडीबद्दल विचारण्यात आले.
-
त्यावर तो म्हणाला, “प्रियांका ही सध्या गोल्फ खेळाला प्राधान्य देते. ती गोल्फच्या कपड्यात फार चांगली दिसते. त्यामुळेच तिला तो खेळ आवडतो.”
-
दरम्यान प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचं बाळ २७ व्या आठवड्यात जन्माला आलं आहे.
-
नियोजनानुसार बाळाचा जन्म एप्रिल महिन्यात होणार होता. मात्र त्या आधीच त्याचा जन्म झाल्यानं बाळाला रुग्णालयातच डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं.
-
त्यानंतर आता काही महिन्यांपूर्वी प्रियांका आणि निकने त्यांच्या बाळाला घरी आणले आहे.
-
काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या बाळासोबतचे फोटो शेअर केले होते.
-
मात्र यातील एकाही फोटोत प्रियांकाच्या बाळाचा चेहरा समोर आलेला नाही. त्यामुळे तिचा चेहरा पाहण्यासाठी प्रियांकाचे चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

IND vs ENG: ऐतिहासिक! भारताचा ५८ वर्षांत बर्मिंगहममध्ये इंग्लंडविरूद्ध पहिला विजय; नवख्या टीम इंडियाचा विक्रम