-
अभिनेता रणबीर कपूर हा लवकरच ‘शमशेरा’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासोबत रणबीर आणि आलियाने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.
-
रणबीर हा लवकरच बाबा होणार आहे. काही दिवसांपूर्वी आलिया भट्टने एक फोटो शेअर करत तिच्या प्रेगेंन्सीची बातमी शेअर केली होती. तेव्हापासून रणबीर कपूरही चर्चेत आला आहे.
-
रणबीर कपूरच्या चारही पिढ्या या सिनेसृष्टीत असल्या तरी त्यांच्यात कोणीही उच्च शिक्षण घेतलेले नाही.
-
त्यामुळे रणबीर हा दहावी पास झाल्यानंतर कपूर कुटुंबियांनी घरी जंगी पार्टी केली होती.
-
नुकतंच एका मुलाखतीदरम्यान रणबीरने याबाबतचा किस्सा सांगितला आहे.
-
यावेळी त्याने त्याला दहावीला किती टक्के गुण मिळाले होते? याबद्दलही सांगितले आहे.
-
“मी अभ्यासात फार हुशार नव्हतो. मी माझ्या कुटुंबातील पहिला मुलगा आहे ज्याने दहावीची परीक्षा पास केली आहे”, असे रणबीर म्हणाला.
-
“मला दहावीत ५३.४ टक्के मिळाले होते. जेव्हा माझ्या परीक्षेचा निकाल लागला. तेव्हा माझे कुटुंबीय फार आनंदात होते”, असेही रणबीरने सांगितले.
-
“त्यावेळी माझ्या कुटुंबाने खूप मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. मी दहावी पास होईन की नाही याची त्यांना अजिबात खात्री नव्हती”, असा खुलासाही रणबीरने केला.
-
“मी माझ्या कुटुंबातील पहिला मुलगा आहे ज्याने १० वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मी अभ्यासात फार कच्चा होतो”, असेही त्याने म्हटले.
-
दरम्यान याआधीही रणबीर कपूरने २०१७ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीतही तो कपूर कुटुंबातील सर्वात सुशिक्षित व्यक्त असल्याचे सांगितले होते.
-
“माझ्या कुटुंबाचा शैक्षणिक इतिहास फारसा चांगला नाही. मी ८ वी पास नापास आहे. तर माझे काका ९ वी नापास आणि आजोबा ६ वी नापास आहेत. त्यामुळे मी माझ्या कुटुंबात खरोखरच सर्वात जास्त शिकलेला व्यक्ती आहे”, असे त्याने या मुलाखतीत म्हटले होते.

IND vs ENG: ऐतिहासिक! भारताचा ५८ वर्षांत बर्मिंगहममध्ये इंग्लंडविरूद्ध पहिला विजय; नवख्या टीम इंडियाचा विक्रम