-
अभिनेत्री आलिया भट्टसाठी यंदाचं वर्ष लकी ठरलं आहे असंच म्हणावं लागेल.
-
यामागचं कारण देखील तितकंच खास आहे. एका वर्षामध्येच तिने आपल्या चाहत्यांना गुडन्यूज दिली.
-
‘गंगूबाई काठियावाडी’, ‘ब्रम्हास्त्र’ हे तिचे दोन्ही चित्रपट सुपरहिट तर ठरलेच.
-
पण त्याचबरोबरीने रणबीर कपूरबरोबर लग्नगाठ बांधत तिने सगळ्यांना सुखद धक्काच दिला.
-
इतकंच नव्हे तर काही महिन्यांपूर्वी तिने आपण गरोदर असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं.
-
आता तिच्या डोहाळे जेवणाची चर्चा सुरु झाली आहे. कपूर तसेच भट्ट कुटुंबीयांनी यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे.
-
आलियाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये सगळं काही खास असणार आहे. आलियाची आई सोनी राजदान आणि नीतू कपूर या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करणार आहेत.
-
तसेच कोणत्या प्रकारचे खाद्यपदार्थ असणार हे देखील आता ठरलं आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, शाकाहारी पदार्थांचा या कार्यक्रमामध्ये समावेश असणार आहे.
-
आलिया-रणबीरच्या लग्नात व्हेगन बर्गर आणि सुशीचा असा वेगळा स्टॉल होता. डोहाळे जेवणासाठीही असाच काहीसा मेन्यू असणार आहे.
-
तसेच डेकोरेशनदेखील लक्षवेधी असेल. रणबीर-आलियाच्या लहानपणापासूनचे फोटो डोकोरेशनसाठी वापरण्यात येणार आहेत.
-
कपूर व भट्ट कुटुंबातील मंडळी तसेच बी-टाऊनमधील काही कलाकार आलियाच्या डोहाळे जेवणाला उपस्थित राहणार आहेत. बहुदा ऑक्टोबर महिन्यात आलियाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार