-    “ऑल इज वेल” म्हणत काल बिग बॉस मराठीच्या घराचा दरवाजा उघडला. 
-    संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता बिग बॉस मराठीच्या सिझन चौथामध्ये कोण सदस्य असतील? 
-    अखेर काल त्या चर्चांना पूर्णविराम लागला १६ सदस्यांची काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एंट्री झाली. 
-    आजपासून १०० दिवस १६ सदस्य कॅमेराच्या काय तर महाराष्ट्राच्या नजरकैदेत असणार असं म्हणायला हरकत नाही. 
-    घरात प्रवेश होताच एकमेकांबद्दल कुरघोड्या आणि टीका सुरु झाल्या आहेत. 
-    नुकताच एक प्रोमो समोर आला असून सदस्यांमध्ये चांगलाच वाद झाल्याचे दिसून येत आहे, याचसोबत मतभेद देखील झाले. 
-    बिग बॉस यांनी जाहीर केले, प्रत्येक गटातील चारही सदस्यांनी हे ठरवायचे आहे कि, कोणता खेळाडू निरुपयोगी आहे? 
-    यावर त्रिशूलने किरण माने यांचं नाव घेतलं होतं, तर अपूर्वाने प्रसादचं नाव घेतलं. 
-    “मी इथे कोणाची मनं जपायला आली नाहीये” असंही ती यावेळी म्हणताना दिसली. यामाचं कारण आजच्या एपिसोडमध्ये समजणार आहे. 
-    त्यामुळे या पर्वात कितीही ऑल इज वेल म्हटलं तरी वादाची ठिणगी पडणार हे निश्चित. 
-    (फोटो सौजन्य- कलर्स मराठी) 
 
  २१ वर्षांनी मोठ्या अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिलेले बोल्ड सीन; मीनाक्षी शेषाद्री म्हणाली, “मला लाज…” 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  