-  
  अभिनेत्री करीना कपूर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. बॉलिवूडमधील गॉसिप क्वीन म्हणून तिला ओळखलं जातं. करीना तिच्या या काही खास मैत्रिणींबरोबरचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या याच जिवलग मैत्रिणींचे फोटोज तिने नुकतेच शेअर केले आहेत.
 -  
  या मैत्रिणी कायम एकत्र वेळ घालवतात. अगदी वेगवेगळ्या पार्टीज, लंचपासून ते वेगवेगळे सण, सोहळे ह्या एकत्र साजरे करतात.
 -  
  करीनाने तिच्या या ग्रुपला ‘माय फॉरएव्हर गर्ल्स’ असं नाव दिलं आहे.
 -  
  तिच्या या ग्रुपमध्ये मलायका अरोरा, अमृता अरोरा, करिश्मा कपूर, मल्लिका भट्ट, आपल्याला बघायला मिळतात.
 -  
  बॉलिवूडमध्ये काम करण्याआधीपासूनच या सगळ्या अत्यंत चांगल्या आणि एकमेकिंच्या घनिष्ट मैत्रिणी आहेत.
 -  
  या सगळ्याजणी स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत कायम चर्चेत असतात.
 -  
  त्या जेव्हा केव्हा बाहेर भेटतात तेव्हा त्यांच्या या ग्रुपबद्दल बॉलिवूडमध्ये आणि मीडियाक्षेत्रात चांगलीच चर्चा होते.
 -  
  करीना त्यांच्या या भेटीचे वेगवेगळे फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असते.
 -  
  नुकत्याच या सगळ्या ‘लंडन’ला फिरायला गेल्या होत्या. त्यादरम्यानचे त्यांचे बोल्ड फोटोज चांगलेच व्हायरल झाले होते. (फोटो सौजन्य : करीना कपूर खान / इन्स्टाग्राम)
 
  “अमिताभ बच्चन व राजेश खन्नांच्या शत्रुत्वामुळे माझे वडील दारूच्या आहारी गेले”, बॉलीवूड अभिनेत्याचे वक्तव्य