-
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा आज ५७वा वाढदिवस आहे.
-
लाखो चाहते सोशल मीडियाद्वारे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
-
इतकंच नव्हे तर मन्नत बाहेरही शाहरुखला भेटण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
-
शाहरुखने आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेटी दिली.
-
शाहरुखचा आगामी ‘पठाण’ चित्रपटाचा टीझर त्याच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित झाला आहे.
-
त्याच्या या टीझरला अवघ्या पाच तासांमध्येच पाच मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत.
-
‘पठाण’च्या टीझरमध्ये शाहरुखचा डॅशिंग अंदाज थक्क करणारा आहे.
-
टीझरमधील संवादांनी प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.
-
अभिनेत्री दीपिका पदुकोणही यामध्ये अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे.
-
तसेच चित्रपटाच्या टीझरमधील तिचा बोल्ड अंदाज सध्या चर्चेत आहे.
-
‘पठाण’ २५ जानेवारी २०२३ला बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. (सर्व फोटो – युट्यूब)

Sara Tendulkar: सारा तेंडुलकरचं ब्रेकअप, बॉलीवूड अभिनेत्याबरोबर नातं फुलण्याआधीच संपलं? कुटुंबाच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय