-
अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोराने आपला मुलगा अरहान खान, बहीण अमृता अरोरा आणि आपल्या पालकांसह मुंबईतील राहत्या घरी ख्रिसमस सेलिब्रेशन केले. (Photo: Malaika Arora/Instagram)
-
यावेळी तिचा जवळचा मित्रपरिवारही उपस्थित होता. यासंबंधीचे फोटो मलायकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. मात्र, यावेळी अभिनेता अर्जुन कपूर दिसला नाही. त्याच्या अनुपस्थितीचे कारण जाणून घेऊया.
-
या सेलिब्रेशनमध्ये मलायकाने आपल्या बहीण आणि आईवडिलांसाह खास पोज दिल्या. (Photo: Malaika Arora/Instagram)
-
यावेळी मलायकाने आपल्या मित्रपरिवारालाही आमंत्रित केले होते. या सेलिब्रेशनच्यावेळी ती नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर दिसत होती. (Photo: Malaika Arora/Instagram)
-
मात्र, यावेळी ती आपला प्रियकर अर्जुन कपूरलाही मिस करत होती. (Photo: Malaika Arora/Instagram)
-
मलायकाने आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, “मेरी ख्रिसमस. अर्जुन, आम्हाला तुझी आठवण आली” (Photo: Malaika Arora/Instagram)
-
अमृता अरोरानेही काही फोटो शेअर केले आहेत. (Photo: Malaika Arora/Instagram)
-
यावेळी ती आपल्या पती आणि मुलांसह पोज दिल्या आहेत. (Photo: Malaika Arora/Instagram)
-
अर्जुनने मलायकाच्या पोस्टला उत्तर देत एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याने लिहिलंय, “या सुट्टीच्या हंगामात रेनडिअर आजारी आहे…? काळजी करू नका, हा कोविड नाही.” या फोटोमध्ये अर्जुन चादर घेऊन बसला आहे, तर त्याने एक सुंदर हेअरबॅन्ड घातले आहे. (Photo: Arjun Kapoor/Instagram)

Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार