-
अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवर गळफास घेत जीवन संपवलं.
-
तिच्या निधनाला आता १० दिवस झाले आहेत.
-
आज तुनिषाचा २१ वा वाढिदवस आहे.
-
पण त्याआधीच अभिनेत्रीने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
-
तुनिषाने आत्महत्या का केली? याबद्दल पोलीस तपास करत आहेत.
-
अशातच तिच्या आत्महत्येप्रकरणी तिचा बॉयफ्रेंड आणि सह-कलाकार शिझान खान कोठडीत असून त्याची चौकशी केली जात आहे.
-
दरम्यान, अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त तिचे चाहते भावूक झाले आहेत.
-
ते सोशल मीडियावर पोस्ट करत तिला शुभेच्छा देत आहेत.
-
तुनिषाचा जन्म ४ जानेवारी २००२ साली झाला होता.
-
तुनिषाने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती.
-
तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं होतं.
-
आत्महत्या केली तेव्हा ती सोनी सब टीव्ही मालिका अली बाबा: दास्तान-ए-काबुलमध्ये तुनिशा राजकुमारी मरियमची भूमिका साकारत होती.
-
तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’, ‘दबंग ३ ‘ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली होती.
-
तुनिषाने ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ मध्ये तरुण कतरिना कैफची भूमिका साकारली होती.
-
कलर्स टीव्हीवरील तिची ‘इंटरनेट वाला लव्ह’ ही मालिका लोकांना खूप आवडली होती.
-
तुनिषाला तिच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करायचं होतं. तिने मित्र विनीत रैनाला याबद्दल सांगितलं होतं.
-
माझ्या वाढदिवसाला आपण पार्टी करू, असं ती विनीतला म्हणाली होती, पण त्यापूर्वीच तिने आत्महत्या करून जीवन संपवलं.
-
(सर्व फोटो – तुनिषा शर्मा इन्स्टाग्राम)

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर