-
वर्ष २०२३ ची धमकेदार सुरुवात झाली आहे. नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात शाहरुख खान आणि सलमान खानसह अनेक कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज आहेत.
-
इतकंच नाही तर या नवीन वर्षं अनेक स्टारकिड्स देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास तयार आहेत. आज आपण अशाच काही स्टारकिड्सच्या आगामी चित्रपटांबद्दल जाणून घेऊया.
-
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली या वर्षी धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे काजोलही या चित्रपटात असणार आहे.
-
आमिर खानचा मुलगा जुनैदही यावर्षी ‘महाराज या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
-
चंकी पांडेचा मुलगा ‘अहान पांडे’ही याच वर्षी अजय देवगणसह एका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
-
शाहरुख खानची मुलगी सुहाना २०२३ मध्ये झोया अख्तरच्या ‘आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
-
सलमान खानची बहीण अलविरा खानची मुलगी अलीजेह अग्निहोत्री सौमेंद्र पाधीच्या नवीन चित्रपटातून पदार्पण करत आहे.
-
अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी यावर्षी सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
-
हृतिक रोशनची चुलत बहीण आणि संगीतकार राजेश रोशनची मुलगी पश्मिना रोशन देखील २०२३ मध्ये इश्क विश्कच्या सिक्वेलद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा