-
‘घर बंदूक बिरयानी’ हा मराठी चित्रपट ७ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता आकाश ठोसरने हटके भूमिका साकारली आहे.
-
आकाशने ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. अशाच एका मुलाखतीत आकाशने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
-
‘चिंगारी अॅप’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आकाशबरोबर एक खेळ खेळण्यात आला.
-
‘नेव्हर आय हॅव एव्हर’ या गेममध्ये आकाशला काही प्रश्न विचारण्यात आले. आकाशने या गेममध्ये विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांना अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली.
-
“एक्सला टोमणे मारायचे म्हणून पोस्ट टाकली आहे का?” असा प्रश्न आकाशला विचारला गेला.
-
यावर उत्तर देत आकाश म्हणाला, “अजिबात नाही. एक्स अशीच बघून जळत असेल. त्यासाठी मला पोस्ट वगैरे टाकायची गरज नाही”.
-
त्यानंतर “क्रशवर छाप पाडण्यासाठी कधी ट्राय केलंस का?” असंही आकाशला विचारण्यात आलं.
-
“कधीच नाही. आपण जसं आहोत, तसं राहायचं. यावरच मुली फिदा होतील,” असं उत्तर आकाशने दिलं.
-
त्यानंतर आकाशला “मुलीने प्रपोज केल्यावर नकार दिलाय का?” असा प्रश्नही विचारण्यात आला.
-
“खरं सांगू का, सैराटआधी माझ्याकडे एकही मुलगी बघत नव्हती. पण आता मला सगळ्यांकडून खूप प्रेम मिळत आहे,” असं आकाश म्हणाला.
-
पुढे आकाश म्हणाला, “मुली परश्यावर, आकाशवर खूप प्रेम करतात. आणि तेवढंच प्रेम मी त्यांच्यावरही करतो.”
-
आकाशने मुलाखतीदरम्यान केलेलं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. ‘सैराट’मधून प्रसिद्धी मिळवलेला आकाश अनेक मुलींचा क्रश आहे.
-
‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटात आकाश ठोसरसह सायली पाटील, नागराज मंजुळे, सयाजी शिंदे हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत.
-
(सर्व फोटो : आकाश ठोसर/ इन्स्टाग्राम)

माजी भाजपा नेत्याबरोबर ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओमध्ये दिसणारी महिला नेमकी कोण?