-
रणवीर सिंगचा आज ३८ वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म ६ जुलै १९८५ साली मुंबईत झाला.
-
आज रणवीर सिंग हा बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे.
-
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे बॉलिवूडमधील सर्वांत हॉट आणि रोमँटिक कपल आहे.
-
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदा २०१३ साली संजय लीला भन्साळी यांच्या ‘राम-लीला’ चित्रपटात एकत्र दिसले होते. त्यांची प्रेमकहाणी तेव्हा सुरू झाली जेव्हा संजय लीला या दोघांना त्यांच्या चित्रपटात कास्ट करण्याविषयी बोलत होते.
-
चित्रपटाच्या शूटिंगसाठी दोघेही संजय लीला भन्साळी यांच्या घरी भेटत असत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एके दिवशी दोघेही संजय लीला यांच्या घरी जेवण करत होते. तिथूनच त्या दोघांच्या प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली.
-
एका मुलाखतीत चित्रपटाच्या क्रू मेंबरने सांगितले की, ‘२०१२ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला-रामलीला’ या चित्रपटाच्या सेटवर अंग लगा दे हे गाणे शूट केले जाणार होते.
-
दोघेही गाण्याच्या शेवटी एक किसिंग सीन फिल्म करणार होते. याच्या शूटिंगदरम्यान, दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही दोघे एकमेकांना किस करत राहिले.
-
हे दोघे भानावर आल्यावर त्यांना कळलं की आपल्या आजूबाजूला अनेकजण आहेत. या चुंबनानंतरच दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. दोघांनी इटलीत १४ नोव्हेंबर २०१८ रोजी कोकणी आणि नंतर सिंधी रितीरिवाजांनुसार इटलीतील लेक कोमो येथील ७०० वर्षे जुन्या व्हिला डेल बाल्बियानेलो येथे लग्न केले.

‘एचएसआरपी’ नंबर प्लेटबाबत मोठी बातमी; आता तांत्रिक दोष आल्यास वाहन विक्रेत्यांकडून…