-
Star Pravah Ganeshotsav 2023: गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत.
-
भक्तीमय वातावरणाने भारावून टाकणारे हे १० दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात.
-
लाडक्या बाप्पाचा हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार सज्ज आहे.
-
‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२३’ या गणपती विशेष कार्यक्रमाची यंदाची थीम आहे आरती घराघरातली.
-
ज्या आरत्या आपण मनोभावाने म्हणतो त्या आरत्या रचल्या कुणी आणि त्यामागची गोष्ट या कार्यक्रमातून दाखवण्यात येईल.
-
सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश-विश्वजीत यांनी या कार्यक्रमासाठी काही आरत्यांना नव्याने संगीतबद्ध केलं आहे.
-
मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचे स्पर्धक आणि प्रवाह परिवारातल्या कलाकारांनी मिळून बाप्पाच्या आरत्या नव्या अंदाजात सादर केल्या आहेत.
-
या गणपती विशेष कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडलीय ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील सार्थक आणि अबोलीने
-
गणरायाच्या या जल्लोषात निर्मिती सावंत आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्यातली धमाल जुगलबंदी कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवणार आहेत.
-
स्टार प्रवाह वाहिनीने मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य प्रत्येक कार्यक्रमातून जपलं आहे.
-
त्यामुळे स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२३ आरती घराघरातली हा कार्यक्रम देखिल पुन्हा एकदा मराठी परंपरेचं दर्शन घडवेल.
-
तेव्हा पाहायला विसरु नका रविवार २४ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजल्यापासून स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२३.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह / इन्स्टाग्राम)
-
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल