-
‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली अर्थात अभिनेत्री जुई गडकरी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते.
-
जुई कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे, तर कधी वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे चर्चेत असते.
-
अलीकडेच जुईने इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी अ क्वेशन’ सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी विविध प्रश्नांचा भडीमार केला. पण चाहत्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिनं दिलं.
-
या सेशनमध्ये चाहत्यांनी जुईला तिच्या फिटनेसपासून ते तिच्या लग्नापर्यंतचे विविध प्रश्न विचारले.
-
यावेळी एका चाहतीने अभिनेत्रीला विचारलं की, तुझ्या केसांसाठी तू काय वापरतेस? प्लीज सांग.
-
जुई तिच्या केसाविषयी म्हणाली, “माझ्या आईमुळे माझे केस चांगले, सिल्की आणि सरळ आहेत. माझ्या आईचे केस खूप चांगले आहेत. त्यामुळे ही गोष्टी मला तिच्याकडून आली आहे. म्हणून मी केसांसाठी फार काही गोष्टी करत नाही.”
-
पुढे जुई म्हणाली, “माझेही केस मध्येमध्ये गळतात. पण मी केसांसाठी जास्त काही करत नाही. बाबा जे घरी तेल बनवतात तेच लावते. तांदळाचं पाणी लावते.”
-
“मी केसांच्या हेअरस्टाइल जास्त करत नाही. दररोज स्ट्रेटनिंग वगैरे करत नाही. लोकप्रिय कंपन्यांचे शॅम्पू जास्त वापर करत नाही. शिवाय फार काही फॅन्सी गोष्टी मी वापरत नाही,” असं जुईने सांगितलं.
-
दरम्यान, जुईचं सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील कामाचं चहूबाजूने कौतुक केलं जात आहे.

पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश