७० च्या दशकात भारतीय फिरकी आक्रमणाचा कणा ठरलेले महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन झालं आहे. (Photo Source: ESPNcricinfo) बिशन सिंह बेदी यांच्या कुटुंबात बॉलिवूड सेलिब्रिटींचा सुद्धा समावेश आहे. बेदी यांचा लेक व सून बॉलिवूडमधील सर्वश्रुत सेलिब्रिटी आहेत.(Photo Source: ESPNcricinfo) २५ सप्टेंबर १९४६ मध्ये अमृतसर येथे बिशन सिंह बेदी यांचा जन्म झाला होता. त्यांनी आपल्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत २६६ विकेट्स घेतल्या होत्या. १९७४ मधेय भारताच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील विजयात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. (Photo Source: ESPNcricinfo) तब्बल १२ वर्ष त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये योगदान दिले होते. १९६६ ते १९७९ पर्यंत त्यांनी ६७ कसोटी सामन्यांमध्ये २६६ विकेट्स घेतल्या होत्या व २२ सामन्यांमध्ये त्यांनी कर्णधारपद भूषवले होते. (Photo Source: ESPNcricinfo) १९७० मध्ये बेदींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर २००४मध्ये सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते.(Photo Source: ESPNcricinfo) बिशन सिंह बेदी यांच्या नेटवर्थ विषयी सांगायचे तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार बेदी यांची संपत्ती साधारण १२. ४७ कोटी इतकी असू शकते. बिशन सिंह बेदी यांच्या कुटुंबात त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी अंजु इंद्रजीत बेदी, चार अपत्य अंगद बेदी, गावस इंदर बेदी, नेहा बेदी आणि गिलिंदर बेदी यांचा समावेश आहे. (Photo Source: @nehadhupia/instagram) बिशन सिंह बेदी यांची सून म्हणजे नेहा धुपिया बॉलिवूडमधील बहुचर्चित नाव आहे. अंगद व त्याचे वडील बिशन सिंह यांचे नाते खूप खास होते, ते दोघे एकत्र एका चित्रपटात सुद्धा दिसून आले होते (Photo Source: @nehadhupia/instagram) १२ ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या घुमर या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. अभिषेक बच्चन व सैयामी खेर यांच्यासह बेदी यांनी चित्रपटात भूमिका पार पडल्यावर अंगद बेदीने एका मुलाखतीत आनंद व्यक्त केला होता. (Photo Source: @nehadhupia/instagram)