-
दिया मिर्झा हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. दिया ही बॉलिवूडमधील टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहे आणि वयाच्या ४२ व्या वर्षीही तिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनातील आपली जागा कायम ठेवली आहे.
-
अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटांशिवाय दिया मिर्झा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.
-
दियाचे वैयक्तिक आयुष्य चढ-उतारांनी भरलेले आहे. दिया मिर्झाने दोनदा लग्न केले आहे.
-
तिचे पहिले लग्न साहिल संघाशी झाले होते. दोघांची पहिली भेट २००९ मध्ये झाली होती. साहिल दियाला चित्रपटाची स्क्रिप्ट सांगण्यासाठी गेला होता.
-
या भेटीनंतर हळूहळू त्यांच्यातील संवाद वाढत गेला आणि दोघे प्रेमात पडले. जवळपास ६ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर एके दिवशी साहिलने दियाला प्रपोज केले. २०१४ मध्ये दोघांनी लग्न केले.
-
लग्नाच्या सुरुवातीला सर्व काही ठीक होते, पण काही वर्षांनी त्यांच्या नात्यात अंतर वाढू लागले.
-
लग्नाच्या ५ वर्षानंतर दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये दोघेही एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे झाले.
-
दरम्यान, २०२० मध्ये दियाची भेट बिझनेसमन वैभव रेखीशी झाली. त्यावेळी भारतात करोना व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरू होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संपूर्ण लॉकडाऊन दरम्यान दिया वैभवसोबत होती.
-
दोघेही जवळपास एक वर्ष एकमेकांना डेट करत होते आणि त्यांनी त्यांचे नाते लपवून ठेवले होते.
-
एक वर्ष एकमेकांसोबत चांगला वेळ घालवल्यानंतर आणि एकमेकांना समजून घेतल्यानंतर, दिया आणि वैभव यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांचे लग्न झाले.
-
१४ जुलै २०२१ रोजी या जोडप्याने पालक झाल्याची बातमी दिली. दियाने १४ मे रोजी एका मुलाला जन्म दिला होता, त्याचे नाव त्यांनी अव्यान आझाद रेखी ठेवले आहे.
-
वैभवला पहिल्या पत्नीपासून समायला रेखी नावाची मुलगी आहे. (सर्व फोटो – दिया मिर्झा इन्स्टाग्रामवरून साभार)

उंच झाडावर फणा काढून बसला होता भलामोठा किंग कोब्रा, इतक्यात…; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम