-
आलिया भट्ट केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या स्टाइलमुळेही चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पिवळ्या साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
आलिया भट्ट जगप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे, त्यामुळे भारतातच नाही तर जगभरात तिचा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या किलर लूकने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी आलिया इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते.
-
इन्स्टाग्रामवर आलिया भट्टचे ८१.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. अशात आलिया सोशल मीडियावर नेहमी आपले फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
-
आलिया भट्टचे नुकतेच तिचे नवे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.प्रिंटेड पिवळी साडी आणि कट स्लीव्ह ब्लाउजमधील आलियाचा लुक चाहत्यांना फार आवडला आहे.
-
यावेळी तिने गळ्यात चोकर नेकलेस परिधान केला आहे. आलिया भट्टचा हा देसी गर्ल लूक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
-
आलिया भट्टने ब्राऊन शेड मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे. एकूणच या लूकमध्ये ती फार अप्रतिम दिसत आहे.
-
आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, यावर्षी ती फक्त “रॉकी और रानी की प्रेम कहानी” या एका चित्रपटात दिसली आहे.काही वृत्तांनुसार, अभिनेत्री सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट जिग्राच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय आलियाला 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. (सर्व फोटो क्रेडिट आलिया भट्ट इन्स्टा)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL