-    दाक्षिणात्य अभिनेता गोविंद पद्मसूर्या विवाहबंधनात अडकला आहे. 
-    गोविंद पद्मसूर्याने गोपिका अनिलशी लग्नगाठ बांधली. 
-    दोघांनी त्रिशूर येथील वडक्कुनाथन मंदिरात लग्न केलं. 
-    या जोडप्याच्या लग्नात दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक उपस्थित होते. 
-    गोविंदने त्याच्या लग्नाच्या तयारीचे व्हिडीओ त्याच्या युट्यूब चॅनलवर शेअर केले होते. 
-    दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. 
-    चाहते गोविंद व गोपिका यांना सहजीवनासाठी शुभेच्छा देत आहेत. 
-    गोविंद व गोपिका यांचा प्रेमविवाह नाही. 
-    दोघांच्या कुटुंबियांनी त्यांच्यासाठी एकमेकांचं स्थळ आणलं होतं. 
-    त्यानंतर गोविंद व गोपिकाने लग्नाचा निर्णय घेतला. 
-    गोपिका अनिल ही लोकप्रिय मल्याळम अभिनेत्री आहे. 
-    तिने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 
-    गोविंद हा लोकप्रिय होस्ट आहे. 
-    त्याने अनेक मल्याळम चित्रपट व तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 
-    त्याने ‘आला वैकुंठपुरामुलू’ या चित्रपटातही काम केले होते. या चित्रपटात अभिनेत्यासोबत अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत होते. 
-    यानंतर तो नागार्जुन आणि नागा चैतन्य यांच्या ‘बंगाराजू’ चित्रपटातही दिसला होता. 
-    गोविंद व गोपिका यांनी नवरात्रीदरम्यान अष्टमीच्या दिवशी साखरपुडा केला होता. 
-    (सर्व फोटो – गोविंद पद्मसूर्या इन्स्टाग्राम) 
 
  ‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  