-
बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनाला आज ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईहून अचानक बातमी आली की श्रीदेवी यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
-
१३ ऑगस्ट १९६३ रोजी तामिळनाडूमध्ये श्री अम्मा यंगर अय्यप्पन म्हणून जन्मलेल्या श्रीदेवी यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांनी हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपट क्षेत्रात काम केले.
-
वयाच्या १० व्या वर्षी नायिकेची भूमिका करणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या. के.बालाचंदर यांच्या मुंडुर मुदिचू या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती.
-
या चित्रपटात, श्रीदेवी यांनी सेल्वी नावाच्या १८ वर्षांच्या मुलीची भूमिका केली होती, जी तिच्या प्रियकर आणि बहिणीच्या मृत्यूनंतर गरिबीत असलेल्या वृद्ध व्यक्तीशी लग्न करते.
-
या चित्रपटात कमल हसन यांनी श्रीदेवीच्या प्रियकराची भूमिका केली होती तर रजनीकांतने खलनायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात श्रीदेवी यांना रजनीकांतपेक्षा जास्त मानधन मिळाले होते. या चित्रपटानंतर त्यांना साऊथ आणि हिंदी चित्रपटांच्या मोठ्या ऑफर्स येऊ लागल्या.
-
जगात श्रीदेवी यांची फॅन फॉलोइंग इतकी होती की अफगाणिस्तानात त्यांच्यासाठी युद्धविश्रांती घेतली जायची. गोळीबार थांबवला जायचा. वास्तविक, श्रीदेवी आणि अमिताभ बच्चन स्टारर ‘खुदा गवाह’ (१९९२) या चित्रपटाचे शूटिंग अफगाणिस्तानच्या अनेक भागात झाले होते.
-
ज्यावेळी या चित्रपटाचे चित्रीकरण झाले, त्यावेळी अफगाणिस्तानात युद्धाचे वातावरण होते, सर्वत्र गोळीबार सुरू होता आणि क्षेपणास्त्रांचा वापरही सर्रास होता. या सर्व भीतीमुळे लोकांनी घराबाहेर पडणे बंद केले होते.
-
अफगाणिस्तानात असे वातावरण असतानाही राष्ट्राध्यक्ष नजीबुल्ला अहमदझाई यांनी चित्रपटाच्या शूटिंगला परवानगी दिली होती. वास्तविक नजीबुल्ला हे भारतीय चित्रपटांचे मोठे चाहते होते.
-
श्रीदेवी आणि अमिताभ बच्चन जेव्हा शूटिंगसाठी अफगाणिस्तानात गेले होते, तेव्हा राष्ट्राध्यक्ष नजीबुल्ला यांनी केवळ दोघांच्या सुरक्षेसाठी तिथे अर्धे सैन्य तैनात केले होते.
-
त्याच वेळी, जेव्हा जेव्हा चित्रपटाचे शूटिंग होते तेव्हा ते पाहण्यासाठी अफगाणिस्तानातून लोकांची गर्दी व्हायची. श्रीदेवी यांना पाहण्यासाठी तिथे गोळीबार थांबायचा, असे अनेकवेळा व्हायचे. शूटिंग संपलं की पुन्हा गोळीबार सुरू व्हायचा.
-
एकदा असंही घडलं की अफगाण दहशतवादी कमांडर रॉकेट डागणार होता, पण श्रीदेवीला शूट करण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी गोळीबार थांबवला. यामुळेच अफगाणिस्तानचे लोक श्रीदेवीला शांततेचे प्रतीक मानतात.
(फोटो स्रोत: @sridevi.kapoor/instagram)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल