-
सध्या बरेच कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करताना दिसत आहेत. या यादीत आता आणखी एका अभिनेत्याचं आणि अभिनेत्रीचं नाव सामील होणार आहे. लवकरच पुलकित सम्राट व क्रिती खरबंदा लग्न करणार आहेत. (फोटो सौजन्य – पुलकित सम्राट इन्स्टाग्राम)
-
माहितीनुसार, पुलकित व क्रिती १३ किंवा १५ मार्चला लग्नबंधनात अडकणार आहेत. अभिनेता पुलकितचं हे दुसरं लग्न आहे. (फोटो सौजन्य – पुलकित सम्राट इन्स्टाग्राम)
-
पुलकितचं पहिलं लग्न सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिराबरोबर झालं होतं. पण काही काळानंतर एका प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे पुलकित व श्वेताचा घटस्फोट झाला, असं म्हटलं जातं. पण नेमकं काय घडलं? वाचा (फोटो सौजन्य – जनसत्ता)
-
पुलकित व श्वेताचं लग्न २०१४ रोजी झालं होतं. पण एका वर्षातच दोघे विभक्त झाले. माहितीनुसार, २०१५मध्ये श्वेताचा गर्भपात झाला आणि तिला काही दिवसांसाठी सांताक्रूझच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. (फोटो सौजन्य – जनसत्ता)
-
गर्भपातानंतर श्वेताला पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला होता. याचवेळी दुसऱ्याबाजूला पुलकित पत्नीची काळजी घेण्याऐवजी अभिनेत्री यामी गौतमसह वेळ घालवतं होता. (फोटो सौजन्य – जनसत्ता)
-
सूत्रांच्या माहितीनुसार, श्वेता व यामी शेजारी-शेजारी राहत होत्या. जेव्हा श्वेताला पूर्णपणे घरी आराम करायला सांगितलं होतं, तेव्हा यामी व पुलकित दररोज त्याच बिल्डिंगमधील जिममध्ये एकत्र वर्कआउट करायचे. (फोटो सौजन्य – जनसत्ता)
-
पुलकित व यामीने दोन चित्रपट एकत्र केले. त्यावेळेस दोघं एकमेकांच्या अधिक जवळ आले. चित्रपटाच्या सेटवर यामी पुलकितसाठी घरुन जेवण आणतं असतं. जेव्हा दोघांच्या अफेअरच्या अफवा पसरल्या तेव्हा यामीने श्वेताच्या बिल्डिंगमधलं घर सोडलं. तिने याबाबत कोणालाही सांगितलं नाही. (फोटो सौजन्य – जनसत्ता)
-
यामी पुलकितवर पूर्वाश्रमीची पत्नी श्वेताबरोबर घटस्फोट घेण्यासाठी दबाव आणत होती. अखेर पुलकितने २०१५मध्ये श्वेताबरोबर घटस्फोट घेतला. (फोटो सौजन्य – जनसत्ता)
-
पुलकितची पूर्वाश्रमीची पत्नी श्वेता ही एक पत्रकार आहे. घटस्फोट झाल्यानंतर तिने स्वतःमध्ये खूप बदल केले आणि आता ती तिच्या आयुष्यात आनंदी आहे. (फोटो सौजन्य – जनसत्ता)
-
दरम्यान, पुलकितचं नाव यामी गौतम आधी मौनी रॉयबरोबर जोडलं गेलं होतं. अभिनेत्याने करिअरच्या सुरुवातीला मौनीसह ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेत काम केलं होतं. या मालिकेतील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. (फोटो सौजन्य – पुलकित सम्राट इन्स्टाग्राम)
-
पुलकित व मौनीला अनेकदा अफेअरबाबत विचारलं गेलं. पण दोघांनीही अफेअर असल्याचं स्वीकारलं नाही . (फोटो सौजन्य – पुलकित सम्राट इन्स्टाग्राम)
-
आता पुलकित क्रितीसह दुसरं लग्न करण्यासाठी तयार झाला आहे. हरियाणामध्ये मोठ्या थाटामाटात दोघांचा लग्नसोहळा होणार आहे. (फोटो सौजन्य – पुलकित सम्राट इन्स्टाग्राम)

घोटाळेबाज ‘जेन स्ट्रीट’कडून दंडापोटी ४,८४३ कोटी जमा; लगोलग निर्बंध उठवण्याची ‘सेबी’ला विनवणी