-
‘ताल’ हा अक्षय खन्नाच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील अक्षय खन्नाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.
(फोटो : इंडियन एक्सप्रेस) -
‘दृष्यम 2’ मध्ये अक्षय खन्नाने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अक्षय खन्नाच्या जबरदस्त अभिनयाने सर्वांची मने जिंकली.
(फोटो : अक्षय खन्ना/इन्स्टाग्राम) -
‘बॉर्डर’ या चित्रपटात अक्षय खन्ना देखील मुख्य भूमिकेत होता. या सुपरहिट चित्रपटामध्ये अक्षय खन्नाचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला होता. -
2003 मध्ये आलेल्या ‘हंगामा’ चित्रपटात अक्षय खन्नाने हे सिद्ध केले की तो पडद्यावर चांगली कॉमेडी देखील करू शकतो. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई ही केली होती.(फोटो : अक्षय खन्ना/इन्स्टाग्राम) -
अक्षय खन्नाने ‘रेस’ मध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या ब्लॉकबस्टर चित्रपटात अनिल कपूर आणि सैफ अली खान देखील दिसले होते.
(फोटो : इंडियन एक्सप्रेस) -
2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हमराज’. या चित्रपटात अक्षय खन्नाने एका खलनायकाची भूमिका उत्तम प्रकारे साकारली होती. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा