-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिका नेहमीच चर्चेचा विषय असते. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
२०१९पासून सुरू झालेली ‘आई कुठे काय करते’ ही मालिका गेले चार वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचली आहेत. या मालिकेच्या मुख्य केंद्रबिंदू असणाऱ्या अरुंधती या पात्राला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळालं आहे. ती महिलांसाठी एक आयडॉल झाली आहे. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
‘आई कुठे काय करते’ मालिकेने लोकप्रियतेची एक वेगळीच उंची गाठली आहे. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
पण आता हे चित्र पूर्णपणे बदलताना दिसत आहे. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना सुमार वाटू लागले आहेत. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
अलीकडेच मालिकेत अरुंधतीचा सुरू झालेला नवा प्रवास हा पाहून प्रेक्षकांनी खूप ट्रोल केलं होतं. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
अशातच ‘आई कुठे काय करते’ मालिकेची संध्याकाळची वेळ बदलण्यात आली. १८ मार्चपासून संध्याकाळी ७.३० वाजता ऐवजी दुपारी २.३० वाजता मालिका प्रसारित होऊ लागली आहे. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
‘आई कुठे काय करते’ मालिकेची जागा ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नव्या मालिकेने घेतली. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
पण नवीन ट्विस्ट आणि नवीन वेळ या दोन कारणांमुळे ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या टीआरपीवर मोठा परिणाम झाल्याचं दिसत आहे. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
मागील आठवड्याच्या टीआरपी रिपोर्टनुसार, ‘आई कुठे काय करते’ मालिकेचा टीआरपी मोठ्या प्रमाणात घसरला आहे. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
गेल्या काही वर्षांपासून टॉप-१० असणारी ‘आई कुठे काय करते’ मालिका थेट १६व्या स्थानावर पोहोचली आहे. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
टीआरपी रिपोर्टमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून सहाव्या स्थानावर ‘आई कुठे काय करते’ मालिका होती. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
आता मागील आठवड्याच्या टीआरपी रिपोर्टमध्ये ‘आई कुठे काय करते’ मालिका १६व्या स्थानावर असून ३.४ रेटिंग मिळाले आहे. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
‘स्टार प्रवाह’वर सुरू झालेल्या नवीन मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ व ‘साधी माणसं’ टॉप-१०मध्ये आहेत. ‘घरोघरी मातीच्या चुली’ सहाव्या स्थानावर असून साधी माणसं आठव्या स्थानावर आहे.

Maharashtra Monsoon Updates : मान्सूनचा प्रवास आजपासून रखडणार! इंग्लंडमधील हवामान तज्ज्ञांनी सांगितले कारण…