-
‘मुरांबा’ मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या रमा आणि रेवा अर्थात शिवानी मुंढेकर आणि निशाणी बोरुले यांनी नुकतीच भारतीय कर्णधार रोहित शर्माची भेट घेतली. (फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर इन्स्टाग्राम )
-
रमा आणि रेवा या दोघीही रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्या आहेत. (फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर इन्स्टाग्राम )
-
रमा आणि रेवा यांनी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, पियुष चावला या खेळाडूंची ९ एप्रिल रोजी पहिल्यांदाच भेट घेतली. यावेळी त्या संपूर्ण टीमला भेटल्या. (फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर इन्स्टाग्राम )
-
शिवानी मुंढेकरने याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर इन्स्टाग्राम )
-
या फोटोंचं क्रेडिट अभिनेत्रीने तिची सहकलाकार काजल काटेला दिलं आहे. ( फोटो सौजन्य : काजल काटे इन्स्टाग्राम )
-
कारण, ‘मुरांबा’ मालिकेतील काजल काटेमुळे रमा आणि रेवा मुंबई इंडियन्सच्या संघाला भेटू शकल्या. ( फोटो सौजन्य : काजल काटे इन्स्टाग्राम )
-
काजलचा पती मुंबई इंडियन्सचा फिटनेस कोच म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. ( फोटो सौजन्य : काजल काटे इन्स्टाग्राम )
-
काजलच्या पतीचं नाव प्रतिक कदम असं आहे. ( फोटो सौजन्य : काजल काटे इन्स्टाग्राम )
-
दरम्यान, छोट्या पडद्यामुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्रींना थेट रोहित शर्माची भेट घेण्याची संधी मिळाल्याने अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( फोटो सौजन्य : काजल काटे इन्स्टाग्राम )

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल