-
‘ठरलं तर मग’ मालिकेत काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रुचिरा जाधवने एन्ट्री घेतली.
-
तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
-
अभिनेत्रीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घर खरेदी करत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
-
रुचिरा जाधवने नवीन घरातील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
नवीन घराच्या दारावर अभिनेत्रीने ‘रवि – माया’ अशी तिच्या आई-बाबांच्या नावाची नेमप्लेट लावली आहे.
-
याशिवाय घरातील एका खोलीच्या दारावर अभिनेत्रीने मोरपीसाचं डिझाइन असलेली तिच्या नावाची नेमप्लेट सुद्धा लावली आहे.
-
नव्या घरात रुचिराने मॉडर्न किचन व फर्निचर बनवून घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
-
रुचिराने नव्या घरात तिला मिळालेले पुरस्कार ठेवण्यासाठी एक वेगळी जागा बनवून घेतली आहे.
-
रुचिराने संपूर्ण घराची झलक दाखवत आपल्या आई-बाबांबरोबर खास फोटो शेअर केले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : रुचिरा जाधव इन्स्टाग्राम )

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL