-
सध्या टीआरपीच्या गणितावरून एखाद्या मालिकेची कालमर्यादा ठरवली जात आहे.
-
जर मालिकेला टीआरपी चांगला असेल तर ती मालिका बरेच वर्ष सुरू ठेवली जाते. पण जर टीआरपी कमी असेल तर ती मालिका अचानक बंद केली जाते.
-
गेल्या अनेक महिन्यांपासून वर्षही पूर्ण न होता पाच किंवा सहा महिन्यांत मालिका अचानक ऑफ एअर झालेल्या पाहायला मिळाल्या. त्यामुळे सध्या मालिकेला चांगला टीआरपी असणं अत्यंत महत्त्वाच झालं आहे.
-
मागील आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. त्यामुळे सध्याच्या टॉप-५ मालिका कोणत्या जाणून घेऊयात.
-
गेल्या काही आठवड्यांपासून सायली व कला मुक्तावर वरचढ होताना पाहायला मिळत आहेत.
-
टीआरपी यादीतील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेची दुसऱ्या स्थानावरील जागा ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेने घेतली आहे. ६.५ इतकं रेटिंग कला-अद्वैतच्या मालिकेला मिळालं आहे.
-
तसंच पहिल्या स्थानावर सायली-अर्जुनची ‘ठरलं तर मग’ मालिका कायम टिकून असून ६.८ रेटिंग मिळालं आहे.
-
तिसऱ्या स्थानावर आता ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका आहे. या मालिकेला ६.४ रेटिंग आहे.
-
चौथ्या आणि पाचव्या स्थानावर अनुक्रम ‘तुझेच मी गीत गात आहे’ आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिका आहेत. ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेला ६.० रेटिंग मिळाले आहे. तर ‘सुख म्हणजे नक्की असतं’ मालिकेला ५.५ रेटिंग मिळालं आहे. (सर्व फोटो सौजन्य- स्टार प्रवाह आणि लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली