-
‘बिग बॉस १७’ फेम खानजादी सध्या चर्चेत आहे.
-
खानजादीने याआधी सांगितलं होतं की बिग बॉसनंतर तिला काम मिळत नाही आहे.
-
खानजादीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हि़डीओ शेअर करून सांगितलं की मुंबईत तिला घर शोधायलादेखील खूप त्रास झाला.
-
खानजादीने शेअर केलेल्या या व्हिडीओत ती म्हणाली, “मी आता माझा चेहरा दाखवू शकत नाही कारण घामाने मी भिजलीय. मी आता शिफ्टिंग करतेय.”
-
“मुंबईत घर शोधणं आणि दिवसात तारे शोधणं हे खूप कठिण आहे.” असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.
-
त्यानंतर तिने अजून एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात ती एक ट्रॉली बॅग घेऊन उतरताना दिसतेय.
-
खानजादीचं खरं नाव फिरोजा खान असं आहे.
-
खानजादी मूळची आसामची असून ‘बिग बॉस १७’मुळे ती प्रसिद्धीझोतात आली. (All Photos- iamkhanzaadi/Instagram)
