-
अभिनेता करण कुंद्रा सध्या अभिनेत्री तेजस्वी प्रकाशसह लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
यासंबंधीचे क्यूट फोटो दोघेही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत आहेत.
-
गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये भांडण होत असल्याने करण आणि तेजस्वीने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला असावा असे म्हटले जात होते.
-
न्यूज-१८ने सूत्रांच्या सांगण्यानुसार दिलेल्या बातमीत म्हटले होते की करण आणि तेजस्वी आता एकमेकांना डेट करत नाही आहेत.
-
अशातच दोघांनी सोशल मीडियावर नवे फोटो पोस्ट करत चाहत्यांना दिलासा दिला आहे.
-
दोघांना एकत्र चांगला वेळ घालवताना पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.
-
त्यांचे गोंडस फोटो सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत.
-
एकत्र फोटोसह करणने त्याचे एकट्याचे फोटोही शेअर केले आहेत.
-
यामध्ये तो वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसत आहेत.
-
साहजिकच हे फोटो तेजस्वीने काढले आहेत.
-
अशातच करणच्या फोटोंवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
-
एका चाहत्याने म्हटले आहे की ‘तेजस्वी तुझ्यापेक्षा जास्त चांगले फोटो काढते.’

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल