-
बॉलीवूड अभिनेत्री आणि इंटरनॅशनल स्टार प्रियांका चोप्रा सध्या ऑस्ट्रेलियात तिच्या आगामी ‘द ब्लफ’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र, शूटिंगमधून वेळ काढून ती प्रवासाचाही आनंद घेत आहे.
-
अलीकडेच अभिनेत्रीने आपल्या मित्रांसह ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथील पॅराडाइज कंट्रीला भेट दिली. अभिनेत्री याचे काही फोटो आणि व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
ऑस्ट्रेलियातील अभिनेत्रीचे शानदार स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान, अभिनेत्रीने ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय कांगारू देखील पाहिले, परंतु एक प्राणी पाहून तिला खूप आश्चर्य वाटले.
-
ऑस्ट्रेलियातील वन अधिकाऱ्याने अभिनेत्रीला सांगितले की, येथील एका कोआलाचे नाव प्रियंका चोप्राच्या नावावर ठेवण्यात आले आहे. खुद्द देसी गर्ल देखील हे जाणून आश्चर्यचकित झाली.
-
व्हिडिओमध्ये, जेव्हा वन अधिकाऱ्याने सांगितले की कोआलाचे नाव प्रियांका आहे, जे स्वतः अभिनेत्रीच्या नावावरून प्रेरित आहे. यावर आश्चर्यचकित होऊन प्रियांकाने त्यांचे आभारही मानले.
-
प्रियंका तिच्या पोस्टमध्ये म्हणाली, “८ महिन्यांच्या कोआला जोईचे नाव माझ्या नावावर ठेवण्यात आले आहे! खुप क्युट… या सुंदर भेटीसाठी आणि वन्यजीवांची ओळख करून दिल्याबद्दल पॅराडाईज कंट्रीचे धन्यवाद.”
-
प्रियंकाने पुढे लिहिले, “मीरकाट्स, कोआला, कांगारू, तस्मानियन डेव्हिल आणि डिंगो! ऑस्ट्रेलियातील वन्यजीव राखीव ठेवण्यासाठी तुम्ही करत असलेल्या सर्व कामांसाठी धन्यवाद.”
-
प्रियांकाने इन्स्टाग्रामवर बेबी कोअलाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

पावसाळ्यात घरात बाथरुममधून गोम, गांडूळ येतात? मग फॉलो करा फक्त ‘या’ 3 ट्रिक्स, पुन्हा दिसणार नाही