अभिनेता अभिषेक बॅनर्जी सध्या स्त्री-२ आणि वेदा चित्रपटामधील त्याच्या भूमिकेसाठी चर्चेत आहे. स्त्री, भेडिया, आणि स्त्री-२ या चित्रपटांमध्ये अभिनेत्याने साकारलेले जनाची विनोदी भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे. मात्र, स्त्री-२ पूर्वी या अभिनेत्याने खलनायकाची भूमिका देखील साकारली आणि या भूमिकेमुळे अभिषेकला एक उत्कृष्ट कलाकार म्हणून ओळख मिळाली. \अभिषेक बॅनर्जीने २००६ मधील ‘रंग दे बसंती’ चित्रपटात एका छोट्या भूमिकेपासून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. पुढे ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवरील ‘पाताल लोक’ वेबसिरीजमध्ये ‘किलर हथोडा त्यागी’ म्हणून त्याने खलनायकी भूमिका साकारली. स्त्री-२ चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हीट ठरला आहे. चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना आणि पंकज त्रिपाठी हे मुख भूमिकेत आहेत.अभिषेक बॅनर्जी आगामी चित्रपट ‘सेक्शन-८४’ या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत दिसणार आहे. सर्व फोटो: अभिषेक बॅनर्जी/इन्स्टाग्राम