-
कॉमेडी कुकिंग शो म्हणजे लाफ्टर शेफ्स हा सध्या भारतीय टेलिव्हिजनवर सर्वात लोकप्रिय शो आहे. या शोने प्रेक्षकांना वेगळ्या शैलीतुन मनोरंजन आणि कॉमेडीचा अनोखा अनुभव दिला आहे, जिथे सेलिब्रिटी जोडपे किचनमध्ये स्वयंपाक आणि विनोद करताना दिसतात. या शोमध्ये भारती सिंग, कृष्णा अभिषेक, जन्नत जुबेर, अंकिता लोखंडे, अली गोनी आणि करण कुंद्रा यांसारखी अनेक मोठे कलाकार आहेत. जाणून घेऊया हे कलाकार प्रति एपिसोड किती कमावतात.
-
कॉमेडीच्या दुनियेत भारती सिंगचे नाव अग्रस्थानी येते. भारतीच्या अप्रतिम कॉमिक टाइमिंग आणि विनोदामुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. टाइम्स ऑफ इंडियामधील एका रिपोर्टनुसार भारती सिंगला लाफ्टर शेफमध्ये प्रति एपिसोड १० ते १२ लाख रुपयांचे मानधन मिळते.
-
भारती सिंगप्रमाणेच कृष्णा अभिषेक हा देखील कॉमेडी विश्वातील मोठा कलाकार आहे. कृष्णाने त्याच्या कॉमिक प्रतिभेने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. लाफ्टर शेफकडून तो प्रति एपिसोड १० ते १२ लाख रुपये कमावतो.
-
भारतीय टेलिव्हिजनची सुप्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे देखील या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. एका एपिसोडमधून ती दीड ते दोन लाख रुपये कमावते.
-
या शोमधील अभिनेता करण कुंद्रा त्याच्या कॉमेडीमुळे लोकप्रिय होत आहे. अभिनेत्याला प्रति एपिसोड २ लाख रुपयांचे मानधन मिळते.
-
या शोमध्ये अर्जुन बिजलानीही त्याच्या कॉमेडीमुळे प्रसिद्ध होत आहे. या शोमधील एका एपिसोडसाठी त्याला २ रुपयांचे मानधन मिळते.
-
अली गोनी या शोच्या एका एपिसोडमधून १.५ लाख रुपये कमावतो.
-
जन्नत जुबेर तिच्या कुकिंग पार्टनर रीम समीरसोबत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यातही यशस्वी ठरली आहे. जन्नतची एका एपिसोडची कमाई १ लाख रुपये आहे.
-
रीम समीर देखील या शोच्या एका एपिसोडमधून १ लाख रुपये कमवत आहे.

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल