-
बिग बजेट ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटाची सध्या प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर व जान्हवी कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘देवरा: पार्ट १’ चित्रपट २७ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.
-
‘देवरा’ चित्रपटाच्या माध्यमातून जान्हवी कपूर दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहेत.
-
३०० कोटींचं बजेट असलेल्या ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटात एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री श्रुती मराठे झळकणार आहे.
-
काही दिवसांपूर्वी श्रुतीने ‘देवरा’ चित्रपटाच्या डबिंगचे फोटो शेअर केले होते.
-
त्यानंतर आता श्रुतीने ‘देवरा’ चित्रपटातील लूकचे फोटो शेअर केले आहेत.
-
कोराताला शिवा लिखित, दिग्दर्शित ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटात श्रुती मराठे महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.
-
‘देवरा’ चित्रपटातील लूकचे फोटो शेअर करत श्रुतीने खूप उत्सुक असल्याचं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
-
बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित देवरा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
दरम्यान, याआधीही श्रुतीने बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य – श्रुती मराठे इन्स्टाग्राम आणि ग्राफिक्स टीम )

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल