-
प्रसिद्ध अभिनेत्री व विनोदी कलाकार जेमी लिव्हरने साडीतील पारंपरिक लूक सोशल मीडियावर नुकतेच शेअर केले आहेत.
-
सुप्रसिद्ध विनोदी कलाकार व अभिनेता जॉनी लिव्हर यांची कन्या जेमी लिव्हर विनोदी कलाकृतींसाठी अधिक लोकप्रिय आहे.
-
‘किस किसको प्यार करू’, ‘हाऊसफुल्ल ४’, ‘भूत पोलीस’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने विनोदी भूमिका साकारल्या.
-
याव्यतिरिक्त ‘द कपिल शर्मा शो’सारख्या कार्यक्रमामध्ये लोकांना हसविण्याचे कामही जेमीने यशस्वीरीत्या पार पाडले आहे.
-
फक्त बॉलीवूडमध्ये स्वतःला गुंतवून न ठेवता, जेमी स्वतःचे ‘स्टॅण्डअप कॉमेडी’ आणि ‘कॉमेडी शो’सुद्धा करते.
-
या फोटोमध्ये जेमीने हिरव्या रंगाची सोनेरी किनार असलेली साडी नेसली आहे.
-
या साडीवर जेमीने गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
जेमीने साडीवरील सुंदर दागिन्यांनी स्वतःच्या लूकची शोभा वाढवली आहे.
-
गळ्यात पेंडंटसह सोनेरी लॉकेट, हातात सोनेरी बांगड्या व अंगठी, कानातले अशा दागिन्यांनी जेमीची सुंदरता अधिक खुलून आली आहे.
-
या फोटोमध्ये जेमीने फुले आणि पुस्तक हातात धरून पोज दिली आहे.
-
या फोटोमध्ये जेमीने पुस्तक वाचत असल्याचे भाव व्यक्त केले आहेत.

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा