-
कोरियन ड्रामाने (K- Drama) जगभरात स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला ‘मिस्टर प्लँक्टन’ खूप चर्चेत आहे. या ड्रामामधील उत्तम कथा आणि उत्कृष्ट अभिनय यांचा मिलाफ प्रेक्षकांना आवडलाय. तुम्हाला ‘मिस्टर प्लँक्टन’ सारखेच इतर मजेदार आणि रोमांचक कोरियन ड्रामे पाहायचे असतील, तर आम्ही तुमच्यासाठी काही उत्तम K -drama ची यादी घेऊन आलो आहोत. (Photo: Netflix)
-
A Killer Paradox
तुम्हाला रहस्यपट आणि थ्रिलरपट आवडत असतील तर हा ड्रामा तुमच्यासाठी योग्य आहे. ‘अ किलर पॅराडॉक्स’ची कथा तुम्हाला शेवटपर्यंत विचार करायला लावेल. ही सिरीज तुम्ही Netflix वर पाहू शकता. (Photo: Netflix) -
D.P.
ॲक्शनपट प्रेमींसाठी ‘डीपी’ हा ड्रामा एक फुल पॅकेज आहे. यामध्ये कोरियन अभिनेता जंग हाय इनची धमाकेदार ॲक्शन पाहायला मिळते. लष्करावर आधारित या ड्रामामध्ये सस्पेन्स आणि भावनांचा उत्तम मेळ घातला आहे. (Photo: Netflix) -
Hellbound
‘हेलबाउंड’ ही एक अतिशय लोकप्रिय कोरियन सिरीज आहे, या सिरिजचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले आहे. हा खास थ्रिलर तुम्हाला तुमच्या खुर्चीला बांधून ठेवेन. या नाटकाचा दुसरा सीझनही नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे, तो पाहायला विसरू नका. (Photo: Netflix) -
My Name
‘माय नेम’ ही एका महिलेच्या सूडाची कथा आहे, जी थ्रिल आणि ॲक्शनने भरलेली आहे. हा ड्रामा त्याच्या ट्विस्ट्स आणि अभिनेत्यांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. तुम्ही हा ड्रामा Netflix वर पाहू शकता. (Photo: Netflix) -
Sweet Home
भयपट आणि थ्रिलरचा उत्तम मिलाफ म्हणजे ‘स्वीट होम’ हा ड्रामा तुम्हाला खूप आनंद देईल. यात भितीदायक दृश्य अबू एक रहस्यकथा आहे, जी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. हॉररपटप्रेमी चाहत्यांसाठी हा ड्रामा उत्तम पर्याय आहे. (Photo: Netflix) -
Vincenzo
ॲक्शन आणि ड्रामाचं हे आणखी एक जबरदस्त पॅकेज आहे. ‘व्हिन्सेंझो’ एका कायदेशीर खटल्याची कथा उत्तम ॲक्शन आणि रोमांचक ट्विस्टमधून मांडतो. तुम्ही हा ड्रामा Netflix वर पाहू शकता. (Photo: Netflix) -
The Trunk
२९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणारी ‘द ट्रंक’ ही वेबसिरीज एका गुप्त विवाह सेवेभोवती फिरते. या सिरीजमध्ये लपलेली रहस्ये आणि नातेसंबंधांच्या सस्पेन्सने भरलेली कथा आहे. ही मालिका लवकरच नेटफ्लिक्सवर उपलब्ध होईल. (Photo: Netflix)

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर