-
‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमधून अभिनेत्री रेश्मा शिंदे घराघरांत लोकप्रिय झाली.
-
रेश्माने वैयक्तिक आयुष्यात २९ नोव्हेंबरला लग्नगाठ बांधली.
-
रेश्मा आणि पवनच्या लग्नाला मालिकाविश्वातील बरेच कलाकार उपस्थित होते.
-
रेश्माचा नवरा पवन नेमकं काय काम करतो? याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने याबद्दल खुलासा केला आहे.
-
पवन हा साऊथ इंडियन असून तो आयटी प्रोफेशनमधला आहे.
-
पवन गेली सात ते आठ वर्षे युकेमध्ये काम करतोय पण, रेश्मासाठी त्याने आता भारतात परतण्याचा निर्णय घेतलाय.
-
अभिनेत्री यावर म्हणते, “माझ्या कामाचं स्वरुप पाहता मला बाहेरगावी जाणं शक्य नव्हतं. अभिनय क्षेत्रात मला भारतात राहून जास्त संधी उपलब्ध होतील.”
-
याशिवाय अभिनेत्रीने नुकताच नवीन व्यवसाय सुद्धा सुरू केलाय. हा सगळा विचार करून पवनने भारतात परतण्याचा निर्णय घेतल्याचं रेश्माने सांगितलं.
-
दरम्यान, थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यावर आता रेश्मा पुन्हा एकदा कामावर परतली असून तिने मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. ( सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे इन्स्टाग्राम व a9ragphotography, मेकअप आर्टिस्ट – madhurikhese_makeupartist )

Mumbai Metro: मुंबईतील नव्या मेट्रो स्थानकात किळसवाणं कृत्य; व्हायरल VIDEO वर मुंबईकरांचा संताप