-
ए.आर. रहमानचा ‘द वंडरमेंट टूर’ शनिवारी मुंबईत सुरू झाला. (Photo: PR Handout)
-
मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या संगीत कार्यक्रमाला ४०,००० हून अधिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावली. (Photo: PR Handout)
-
ए.आर. रहमानचा संगीत कार्यक्रम हा वेव्हज समिट २०२५ च्या प्रमुख कार्यक्रमांपैकी एक होता. (Photo: PR Handout)
-
मुंबईतील कॉन्सर्टमध्ये ए आर रहमान आणि गायक सुखविंदर सिंग. (Photo: PR Handout)
-
रहमानसोबत गायिका जोनिता गांधीही सामील झाली. (Photo: PR Handout) -
ए आर रहमान यांचा मुलगा ए आर अमीन आणि आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांनी ए आर रहमानबरोबर परफॉर्म केले. (Photo: PR Handout)
-
गायक मोहित चौहान आणि अभिनेता-गायक धनुष हे देखील ए.आर. रहमानच्या मुंबईतील संगीत कार्यक्रमात सहभागी झाले होते. (Photo: PR Handout)
-
धनुषने ए.आर. रहमानसोबत लाईव्ह परफॉर्मन्सही केला. (Photo: PR Handout)
-
“An absolute honour @arrahman sir “, अशा शब्दात धनुषने कॉन्सर्टमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (Photo: PR Handout) -
“जेव्हा धनुष आणि रहमान यांनी सादरीकरण केले तेव्हा ते अद्भुत होते,” अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. (Photo: PR Handout)
-
कार्यक्रमानंतर ए.आर. रहमान यांनी “Thank you my clan for showering love, see you soon!” अशा कॅप्शनची पोस्ट सोशल मीडियावर केली. (Photo: PR Handout)
-
संगीत कार्यक्रमातील सादरीकरणे श्यामक दावर यांनी कोरिओग्राफ केली होती. (Photo: PR Handout)

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक