-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) सध्या तिच्या फॅशनमुळे चांगलीच चर्चेत आहे.
-
“Blurring lines of day and night” असे कॅप्शन देत तमन्नाने तिचा एक बोल्ड आणि तितकाच ग्लॅमरस अवतार चाहत्यांसमोर आणला आहे.
-
या फोटोंमध्ये तमन्नाने काळ्या रंगाचा स्पोर्ट्स ब्रालेट, त्यावर पांढरा ट्रॅक जॅकेट आणि खाली सिल्व्हर आणि काळ्या रंगाच्या सिक्विन वर्क असलेला लाँग स्कर्ट परिधान केला आहे
-
हा स्कर्ट तिच्या प्रत्येक हालचालीसोबत चमकत आहे आणि तिच्या लूकला एक खास ग्लॅमरस टच देत आहे.
-
तिच्या या हटके स्टाइल स्टेटमेंटने नवा फॅशन ट्रेंड ठरत आहे.
-
तमन्नाचा मेकअप न्यूड टोन्समध्ये असून तिने केस मोकळे सोडले आहेत, ज्यामुळे तिचे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
-
तिने विविध पोझेसमध्ये हे फोटो काढले आहेत, ज्यात तिचा आत्मविश्वास आणि स्टाइलची झलक स्पष्टपणे दिसते.
-
तमन्ना भाटिया केवळ तिच्या अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या स्टायलिश अंदाजासाठीही ओळखली जाते.
-
ती नेहमीच नवनवीन फॅशन ट्रेंड्स ट्राय करत असते आणि तिच्या प्रत्येक लूकमधून एक वेगळी प्रेरणा मिळत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : तमन्ना भाटिया/इन्स्टाग्राम)

दररोज एक केळे खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होईल? आहारतज्ज्ञांनी दिली आश्चर्यकारक माहिती…