-
अलीकडेच अर्चनाचा मुलगा आर्यमन सेठीने (Aaryamann Sethi) एका व्हिडिओमध्ये त्याच्या प्रेयसीची (Girlfriend) ओळख सर्वांना करून दिली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यापासून चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की, ती कोण आहे? जी अर्चना (Archana pruan singh) आणि परमीतच्या घरची मोठी सून कोण होऊ शकते. चला जाणून घेऊयात तिच्याबद्दल…
-
त्या मुलीचे नाव योगिता बिहानी (Yogita Bihani) आहे, ती व्यवसायाने मॉडेल (Model) आणि अभिनेत्री (Actress) आहे. (Photo: Aarya vlogs)
-
तिने ‘द केरळ स्टोरी’ (The kerala Story) या चित्रपटात काम केले आहे. (Photo: Yogita Bihani/Instagram)
-
तिने छोट्या पडद्यापासून कारकिर्दीला सुरुवात केली आणि हळूहळू चित्रपटांपर्यंत पोहोचली. तिचा जन्म ७ ऑगस्ट १९९५ रोजी राजस्थानमधील बिकानेर (Bikaner, Rajasthan) शहरात झाला. (Photo: Yogita Bihani/Instagram)
-
योगिताने दिल्ली विद्यापीठातून (Delhi University) संगणक शास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. तिचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, सुरूवातीला तिने एका फूड कंपनीच्या स्टार्टअपमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, योगिता सोशल मीडियावर देखील खूप प्रसिद्ध आहे. (Photo: Yogita Bihani/Instagram)
-
सलमान खानच्या गेम शो ‘दस का दम’ (Salman Khan Show Dus ka dum) मधून योगिताला पहिला मोठा ब्रेक मिळाला. तिने या शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला, त्यानंतर तिला टीव्ही मालिकांसाठी ऑफर येऊ लागल्या. २०१८ मध्ये तिला एकता कपूरच्या रोमँटिक शो ‘दिल ही तो है’ (Dil Hi To Hain) मध्ये काम करण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये तिने पलक शर्माची भूमिका केली होती. (Photo: Yogita Bihani/Instagram)
-
अनेक टीव्ही शोमध्ये काम केल्यानंतर, योगिता चित्रपटांकडे वळली. तिला ‘एके व्हर्सेस एके’ आणि ‘विक्रम वेधा’ (Vikran Vedha) सारख्या चित्रपटांमध्ये छोट्या पण शक्तिशाली भूमिका मिळाल्या. (Photo: Yogita Bihani/Instagram)
-
योगिताला खरी ओळख २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात अदा शर्माने (Adah sharma) मुख्य भूमिका साकारली होती आणि योगिताने निमाची भूमिका साकारली होती. (Photo: Yogita Bihani/Instagram)
-
या चित्रपटाला खूप पसंती मिळाली आणि त्याने भारतात २४१.७४ कोटी रुपये आणि जगभरात ३०२ (302 Cr) कोटी रुपये कमावले. (Photo: Yogita Bihani/Instagram) हेही पाहा- प्रथमेश परब- ज्ञानदा रामतीर्थकर ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र; प्रमोशनसाठी गाठली थेट मुंबई लोकल, पाहा फोटो

कॅन्सरला लांब ठेवायचं असेल तर ‘ही’ तीन पेय महिन्यातून एकदा प्या; डॉक्टरांनी सांगितला आश्चर्यकारक परिणाम