-
चित्रपट कलाकारांच्या मैत्रीच्या कथा खूप प्रसिद्ध आहेत. पडद्यावर एकमेकांशी भांडणारे दोन कलाकार खऱ्या जीवनात मात्र चांगले मित्र होते. या कलाकारांची मैत्री चाहत्यांमध्ये प्रसिद्ध होती. त्यांच्या मैत्रीबद्दल अनेक मासिके आणि वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापून आलेल्या आहेत. (Photo: Social Media)
-
दिलीप कुमार, राज कपूर आणि प्राण
हिंदी चित्रपटांमधील या तिन्ही महान अभिनेत्यांमधील मैत्रीही खूप प्रसिद्ध होती. दिलीप कुमार आणि राज कपूर त्यांच्या पाकिस्तानच्या काळापासून एकत्र होते. चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान प्राण साहेबांशी त्यांची मैत्री झाली. या तिघांची मैत्री प्रसिद्ध होती. (Photo: Social Media) -
विनोद खन्ना आणि फिरोज खान
यांची मैत्री त्यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीपासून त्यांच्या शेवटपर्यंत टिकली. जेव्हा इंडस्ट्रीतील मित्रांचा विचार केला जातो तेव्हा या जोडीचा सर्वात आधी उल्लेख केला जातो. त्यांच्या मृत्यूंबाबतही योगायोग घडला होता, दोघांनीही एकाच दिवशी जगाचा निरोप घेतला होता. फक्त वर्ष वेगवेगळे होते. फिरोज खान यांचे २७ एप्रिल २००९ रोजी निधन झाले आणि विनोद खन्ना यांनी २७ एप्रिल २०१७ रोजी जगाचा निरोप घेतला. (Photo: Social Media) -
हेलन, आशा पारेख आणि वहिदा रहमान
हेलन, आशा पारेख आणि वहिदा रहमान यांच्यात या वयातही एक खास मैत्रीपूर्ण नाते आहे. या तिघीही डिनर डेट्स आणि क्रूझवर एकत्र दिसतात. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. (Photo: Social Media) -
ऋषी कपूर, जितेंद्र आणि राकेश रोशन
ऋषी कपूर आता या जगात नाहीत. पण आजही जितेंद्र आणि राकेश रोशन यांच्याशी असलेल्या त्यांच्या मैत्रीची चर्चा होते. पूर्वी हे तिघेही अनेकदा भेटत असत आणि पार्टी करत असत. पण ऋषी गेल्याने आता भेटी पूर्वीसारख्या राहिलेल्या नाहीत. (Photo: Social Media) -
जया बच्चन आणि डॅनी
चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणारा डॅनी आणि जया बच्चन अॅक्टिंग स्कूलमधील पहिल्या दिवसापासून चांगले मित्र आहेत. असेही म्हटले जाते की जया बच्चन यांनी डॅनीला डॅनी हे नाव दिले. (Photo: Social Media) -
शाहरुख खान आणि काजोल
शाहरुख खान आणि काजोलची मैत्री खूप खास आहे. ‘बाजीगर’ चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली, आणि तिथूनच त्यांच्या खऱ्या जीवनातील मैत्रीची सुरुवात झाली. त्यांची जोडी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे, आणि त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. (Photo: Social Media) -
करीना कपूर- मलायका अरोरा
करीना कपूर आणि अमृता अरोराची मैत्री खूप खास आहे. त्यांची एक गर्ल्स गँगसुद्धा आहे. ज्यामध्ये करीना, अमृताबरोबर करिश्मा आणि मलायका अरोराचा देखील समावेश आहे. (Photo: Social Media) -
सलमान खान आणि शाहरुख खान
सलमान खान आणि शाहरुख खान यांची मैत्री खूप प्रसिद्ध आहे. १९९० च्या दशकात सलमान आणि शाहरुखची मैत्री खूप चांगली होती. त्यांच्यात काही वाद झाले, पण नंतर त्यांनी ते मिटवून पुन्हा मैत्री केली. (Photo: Social Media) -
मौनी रॉय आणि दिशा पटानी
मौनी रॉय आणि दिशा पटानी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या दोघी अनेकदा एकत्र दिसतात आणि सोशल मीडियावरही त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्या दोघींना अनेकदा एकत्र पाहिले जाते आणि त्या एकमेकींच्या खूप जवळ आहेत. (Photo: Social Media) -
अनन्या पांडे, शनाया कपूर, सुहाना खान
अनन्या पांडे, शनाया कपूर, सुहाना खान आणि नव्या नंदा या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या अनेकदा एकत्र दिसतात आणि सोशल मीडियावर एकमेकींना कमेंट्स देताना दिसतात. (Photo: Social Media) हेही पाहा-WCL च्या अँकरवर स्पर्धेच्या मालकाचा जडला जीव; थेट प्रक्षेपणादरम्यान केलं प्रपोज…

अमेरिकेच्या भारताबद्दलच्या दाव्याला रशियाचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “अमेरिका भारताच्या वस्तू घेणार नसेल तर…”