-
मराठी कलाविश्वाची ‘चंद्रमुखी’ म्हणून अमृता खानविलकरला ओळखलं जातं. अमृताची स्टाइल, तिचा फिटनेस याबद्दल नेहमीच चर्चा होत असते. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी तिच्या युट्यूब चॅनेलवर Vlog शेअर करत तिची दिनचर्या नेमकी कशी असते? याबद्दल माहिती दिली आहे.
-
जवळपास ८ ते १० वर्षांपूर्वी अमृताला PCOD झाल्याचं समजलं. यानंतर तिने जीवनशैलीत पूर्णपणे बदल केला. प्रामुख्याने जेवणाची वेळ बदलली.
-
अमृता म्हणते, “PCOD बाबत समजलं आणि मला संपूर्ण जीवनशैली बदलावी लागली. त्यानंतर मी योगा करू लागले आणि हळुहळू मला फास्टिंग ( उपवास ) आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे याची जाणीव झाली.”
-
अमृता सांगते, “रात्रीचं जेवण ते सकाळचा नाश्ता…यामध्ये तुम्ही किती अंतर ठेवता हे फार महत्त्वाचं असतं. मला माझ्या आहारतज्ज्ञांनी सांगितलं होतं की, रात्रीचं जेवण काहीही करून तुला सायंकाळी ७ ते ७:३० पर्यंत जेवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी ७ वाजल्यानंतरच तुला थेट नाश्ता करायचा आहे. या मधल्या वेळेत पूर्ण उपाशी राहायचं नाही. यादरम्यान, मी पाणी, ग्रीन टी यांचं सेवन करते.”
-
“सुरुवातीला संध्याकाळी ७ ते सकाळी ७ असे १२ तास मी काहीच खायचे नाही…ती वेळ आता वाढलीये…मी आता जवळपास १६ तास तरी काहीच खात नाही. माझ्या रात्रीच्या जेवणाची वेळ आता फारच लवकर असते. मी साधारण ६ ते ६:३० वाजता जेवून मोकळी होते.” असं अमृताने सांगितलं.
-
फास्टिंगनंतर सकाळी उठल्यावर अमृता व्यवस्थित पोटभर नाश्ता करते. फास्टिंगचे विविध प्रकार आहेत १२ तास, १४ तास, १६ तास किंवा महिन्यातून एकदा पूर्ण २४ तास उपवास करणं असं अमृताने सांगितलं.
-
या फास्टिंगमुळे वैयक्तिक आयुष्यात बराच फायदा झाल्याचं अमृताने सांगितलं.
-
अमृता म्हणते, “फास्टिंग काळात मी सर्वात जास्त पाणी पिऊ लागले, यामुळे पचनसंस्थेला पूर्ण आराम मिळतो, सतत मनात जेवणाचा विचार येत नाही. असे सगळे अनेक बदल माझ्या आयुष्यात झाले. तुम्ही सुद्धा अशाप्रकारचं फास्टिंग करू शकता. फक्त सुरुवात १२ तासांच्या फास्टिंगपासून करा.”
-
“या १२ तासांच्या वेळेत आवळा शॉट, तूप-पाणी ( १ ग्लास पाण्यात एक चमचा तूप ), ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, निंबू पाणी ( साखरेशिवाय ) या पेयांचं सेवन तुम्ही करू शकता. मला या दिनचर्येचा प्रचंड फायदा झाला.” असं अमृताने तिच्या व्हिडीओमध्ये सांगितलं. ( सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट )

भर न्यायालयात हल्ला झाल्यावर सरन्यायाधीश गवई यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…