-
‘झी मराठी पुरस्कार २०२५’ हा भव्यदिव्य सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याचं प्रक्षेपण टेलिव्हिजनवर ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी करण्यात आलं. यंदा या सोहळ्यात ‘लक्ष्मी निवास’ मालिकेने सर्वाधिक १९ पुरस्कार जिंकले आहेत. ते कोणते आहेत जाणून घेऊयात…
-
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री व पुरुष हे पुरस्कार सिद्धूची आई ‘रेणुका’ आणि जान्हवीचा मित्र ‘विश्वा’ यांना प्रदान करण्यात आले आहेत.
-
‘रायझिंग स्टार ऑफ द इयर’ हा पुरस्कार जान्हवीला मिळाला आहे. तर, भावना ‘नॅचरल टॅलेंट ऑफ द इयर’ ठरली आहे.
-
सर्वोत्कष्ट भावंडं हा पुरस्कार वेंकी, भावना, जान्हवी या ‘लक्ष्मी निवास’मधील त्रिकुटाने जिंकला आहे.
-
Zee 5 फेव्हरेट व्यक्तिरेखा पुरुष व स्त्री हे पुरस्कार अनुक्रमे जयंत व भावना यांनी जिंकले आहेत.
-
सर्वोत्कृष्ट बालकलाकार हा पुरस्कार आनंदीने पटकावला आहे. हा अवॉर्ड सगळ्या बालकलाकारांना विभागून देण्यात आला होता.
-
जावईबापू सिद्धू आणि सासूबाई लक्ष्मी यांच्या जोडीने ‘सर्वोत्कृष्ट मैत्री’ हा खास पुरस्कार जिंकला आहे.
-
सर्वोत्कृष्ट सासरे – श्रीनिवास, सर्वोत्कृष्ट सासू – लक्ष्मी, सर्वोत्कृष्ट सून – वीणा आणि सिद्धूने सर्वोत्कृष्ट जावई हा पुरस्कार जिंकला आहे.
-
‘लोकप्रिय जोडी’ हा पुरस्कार जयंत-जान्हवीला तर, ‘सर्वोत्कृष्ट अनुरुप जोडी’ या पुरस्कारावर सिद्धू-भावनाने आपलं नाव कोरलं आहे.
-
यंदाचा सर्वोत्कृष्ट नायक ठरला आहे सिद्धू.
-
‘लोकप्रिय कुटुंब’ या पुरस्काराने दळवी कुटुंबाला सन्मानित करण्यात आलं आहे. तर, ‘शायनिंग परफॉर्मन्स’ हा विशेष पुरस्कार लक्ष्मीला प्रदान करण्यात आला आहे.
-
यासह ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका यावर्षीची लोकप्रिय मालिका ठरली आहे. ( सर्व फोटो सौजन्य : झी मराठी वाहिनी इन्स्टाग्राम )

पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार