-
सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. बॉलीवूड सेलिब्रिटींनी सुद्धा व्यग्र शेड्युलमधून वेळ काढत आपल्या कुटुंबीयांसह दिवाळीचा सण साजरा केला. आलिया भट्टने याचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
आलिया भट्टने या फोटोंना ‘दिलवाली दिवाली’ असं कॅप्शन दिलं आहे. तसेच चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.
-
आलियाने दिवाळीच्या पहिल्या दिवशी बेबी पिंक रंगाचा ट्रान्सपेरंट चिकनकारी कुर्ता घातला होता.
-
केसात गजरा, गळ्यात नाजूक नेकलेस या लूकमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती.
-
आलियाच्या दिवाळी पार्टीला तिची सख्खी बहीण शाहीन भट्ट देखील उपस्थित होती.
-
याशिवाय आलियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या मित्रमंडळींसह दिग्दर्शक अयान मुखर्जीची सुद्धा झलक पाहायला मिळत आहे.
-
काही दिवसांपूर्वी आलियाने तिची ३ वर्षांची लेक राहाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदा आलियाने राहाचा फेस रिव्हिल न करता एक खास फोटो शेअर केला आहे.
-
यामध्ये चिमुकली राहा दिवाळीच्या पणत्या रंगवत असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
विशेष म्हणजे राहाने रंगवलेल्या पणत्या रांगोळीजवळ ठेऊन कपूर कुटुंबीयांकडे सुंदर सजावट करण्यात आल्याचं आलियाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : आलिया भट्ट इन्स्टाग्राम )

‘सुंदरी सुंदरी’, गाण्यावर माय-लेकाने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट