-
वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. मात्र, याचा फायदा होईलच असे नाही. जिममध्ये तासंतास व्यायाम करूनही किंवा आपले आवडते पदार्थ खाणे टाळूनही जर तुमचे वजन कमी होत नसेल तर तुम्ही काही गोल्डन रूल फॉलो करून तुमचे वजन कमी करू शकता.
-
हा गोल्डन रूल फॉलो करण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही. ८०/२० चा हा रूल फॉलो करून तुम्ही तुमचे वजन अतिशय जलद गतीने कमी करू शकता.
-
मात्र हा ८०/२० रूल नेमका काय आहे? या नियमानुसार तुम्हाला ८०% निरोगी आणि सकस आहार घ्यायचा आहे तर २०% मध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊ शकता.
-
आरोग्यतज्ञानुसार, यामध्ये तुम्हाला कॅलरी आणि कार्बची चिंता करण्याचीही गरज नाही. त्याचबरोबर हा डाएट फॉलो केल्याने वाढत्या कॉलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवणेही सोपे होऊ शकते.
-
या डाएटनुसार, तुम्हाला तुमच्या आहारात वेगवेगळ्या रंगांच्या भाज्यांचा समावेश वाढवायचा आहे. अशी फळे आणि भाज्यांचे सेवन करा ज्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट आहेत.
-
तुम्ही तुमच्या आवडीनुसार हंगामी भाज्यांचे सेवन करू शकता. मात्र या भाज्या शिजवताना त्यामध्ये तेल आणि मीठ प्रमाणात टाकावेत.
-
अनेकांना असे वाटते की वजन कमी करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळायला हवे. मात्र हा निव्वळ गैरसमज आहे.
-
८०/२० गोल्डन रूलनुसार, वजन कमी करण्यात दुग्धजन्य पदार्थ मदत करतात. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करावा. त्याचबरोबर प्रोटीनचे मुळबलक प्रमाणात सेवन करावे.
-
या रूलची सर्वांत चांगली गोष्ट अशी की यामध्ये तुम्ही तुमचे आवडीचे पदार्थही मनसोक्त खाऊ शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला रात्री मिठाई खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही ते खाऊ शकता.
-
तुम्ही तुमच्या आहारात अशा 20% गोष्टींचा समावेश करू शकता, ज्या तुम्हाला खूप आवडतात. तथापि, हे लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे की पदार्थांचे प्रमाण मर्यादित असावे.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (फोटो : Freepik)

“गरिबासाठी कोण नाही पण देव असतो” अवघ्या ५ सेकंदात कार चालकाला देवानं दिलं कर्माचं फळ, असं काय घडलं? पाहा VIDEO