-
Monsoon Jugaad: हल्ली घर Asthetic दिसावं यासाठी प्रत्येकजण अगदी बारकाईने वस्तूंची निवड- खरेदी करत असतो. पण काही वेळा वापरण्यात व स्वच्छ राखण्यात शिस्त नसेल तर घराचा लुक खर्च करूनही भकासच वाटतो.
-
तुम्हाला घरातील बाथरूम व नळांच्या बाबत एक मोठा त्रास तुम्हीही अनुभवलेला असेल. तो म्हणजे पाण्याचे चिवट डाग.
-
अनेकदा नळ विकत घेताना दुकानदार अगदी कौतुकाचे पूल बांधत असतो, गंज लागणार नाही म्हणून स्टेन्सलेस स्टील, ऍल्युमिनियम अशा धातूंचा वापर हल्ली केला जातो. पण या नळांना पाण्यामुळे पडलेल्या डागापासून सुरक्षित कसं ठेवायचं हे कोणी सांगतं का?
-
आज आपण अवघ्या दोन रुपयांमध्ये बाथरूम आणि किचन मधील नळांचे डाग कसे घालवायचे हे पाहणार आहोत
-
सगळ्यात पहिला जुगाड म्हणजे मेणबत्ती. तुम्ही फक्त दोन रुपयात मिळणारी मेणबत्ती नळाच्या पृष्ठभागावर चांगली घासून घ्या व नंतर हलक्या हाताने पुसून काढा.
-
मेणामुळे नळ आपोआप वॉटरप्रूफ होतात आणि पाणी साचून राहत नाही. एक सोपी टीप म्हणजे शक्यतो पांढरीच मेणबत्ती वापरा जेणेकरून निळे- पिवळे डाग पडणार नाहीत
-
दुसरा उपाय म्हणजे दोन थेंब खोबरेल तेल. नळावर खोबरेल तेल लावून पुसून काढल्यावर तेलाचा थर पाण्याला थारा देत नाही. याऐवजी आपण पॉलिशिंग क्रीमसुद्धा वापरू शकता पण स्वस्तात मस्त तेलाचा पर्याय उत्तम ठरेल.
-
तिसरा उपाय म्हणजे व्हॅसलिन. आपल्याकडे पेट्रोलियम जेलीचे डब्बे थंडी गेल्यावर असेच पडून असतात. दोन बोटांवर ही जेली घेऊन नळाला लावून घ्या व मग कपड्याने हलकेच पुसून काढा ज्यामुळे नळ पाण्यापासून सुरक्षित राहतील.
-
हा जुगाड तुम्ही करून पहा व त्याचा रिझल्ट कसा मिळतोय हे आमच्या सोशल मीडियावरील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
रोहित-विराट संघात नाही, अभिषेक शर्माची निवड तर तिलक वर्मा कर्णधार, ‘या’ वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा