-
सध्या महिला घर आणि नोकरी अशा दुहेरी जबाबदारी पार पाडतात. अनेक स्त्रिया कुटुंब, घर व नोकरी यामध्ये स्वत:ला इतक्या गुंतवून घेतात की, त्या स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. (Photo : Pexels)
-
यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पण, आज आम्ही तुम्हाला प्रत्येक स्त्रीने न चुकता करावीत अशी तीन योगासने सांगणार आहोत. (Photo : Pexels)
-
योग अभ्यासक मृणालिनी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मृणालिनी महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील अशी तीन योगासने करून दाखवत आहेत. ती तीन योगासने आणि त्यांचे फायदे खालीलप्रमाणे : (Photo : Pexels)
-
१. उत्कट कोणासन या आसनामुळे पेल्विक फ्लोर मजबूत बनतो. मासिक पाळीच्या तक्रारी दूर होऊ शकतात. पाय व मांड्यांच्या स्नायूंची ताकद वाढते. (Photo : Pexels)
-
२. मलासन या आसनामुळे पचनशक्ती सुधारते, प्रजननसंस्था सुधारते आणि पाय मजबूत होतात. (Photo : Instagram)
-
३. बद्धकोणासन केल्यामुळे मन शांत राहते. मूत्राशय, गर्भाशय यांचे आरोग्य सुधारते आणि लवचिकता वाढते (Photo : Pexels)
-
भारतीय स्त्रिया कौटुंबिक सदस्यांच्या सेवेत स्वतःला गुंतवून घेतात आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मग वाढत्या वयानुसार आरोग्याच्या समस्या भेडसावतात. (Photo : Pexels)
-
त्यासाठी चालणे, व्यायाम, योगा करणे या बाबींना तुमच्या रोजच्या जीवनशैलीचा एक भाग बनवून घ्या. कारण- त्यामुळे तुमच्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. (Photo : Pexels)
-
ही तीन योगासने ही महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशी आहेत. प्रत्येक योगासन एक ते दोन मिनिटे करावे. (Photo : Pexels)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”