-
ड्रायफ्रुट्स म्हटलं की, त्यामध्ये बदाम, काजू, अक्रोड यांसारख्या पदार्थांसोबतच पिस्त्याचाही समावेश होतो. पिस्ता चविला उत्तम ठरतो, पण याचे इतर फायदे ऐकल्यानंतर तुम्हाला हा आणखी आवडेल. (फोटो : Freepik)
-
पिस्त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, आयर्न, कॅल्शियम, प्रथिने इत्यादी अनेक पोषक तत्वे आढळतात ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते. (फोटो : Freepik)
-
पिस्ता खाल्ल्याने आपले चयापचय वाढते जे आपल्याला सर्दी आणि इतर आजारांपासून वाचवण्यास मदत करते. हे आपली त्वचा, केस आणि नखांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. (फोटो : Freepik)
-
पिस्ता खूप फायदेशीर आहे. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. (फोटो : Freepik)
-
निरोगी प्रौढ व्यक्तीने दररोज किमान ३ ते ४ पिस्ते खावेत.गर्भवती महिलांसाठी दररोज २ ते ३ पिस्ते खाणे अधिक फायदेशीर आहे. मात्र, एका दिवसात ४ पेक्षा जास्त पिस्ते खाणे योग्य नाही. (फोटो : Freepik)
-
पिस्ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याच्या काही समस्याही उद्भवू शकतात. जसे- पोटदुखी, ऍसिडिटी, जुलाब इ. त्यामुळे पिस्ते जास्त प्रमाणात खाऊ नयेत. (फोटो : Freepik)
-
सकाळी रिकाम्या पोटी पिस्ता खाणे अधिक फायदेशीर ठरते. जर तुम्ही रोज रिकाम्या पोटी पिस्ते खाण्याचा विचार करत असाल तर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. (फोटो : Freepik)
-
पिस्ता हृदयासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. पिस्त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म आणि फायबर रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. (फोटो : Freepik)
-
वाढत्या वजन आणि लठ्ठपणाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी पिस्ता हा एक चांगला पर्याय असू शकतो. (फोटो : Freepik)

Raja Gosavi : “पितळी भांडी विकून गुजराण, ब्रेड आणि आमटी…” राजा गोसावींच्या मुलीने उलगडली सुपरस्टारची हलाखी