-
थंडीच्या दिवसात लोकांना सर्दी, खोकला, यांसारख्या समस्यांचा त्रास होऊ लागतो.(फोटो : Freepik)
-
यासोबतच हिवाळा ऋतू जवळ आला की आपली त्वचा आणि केस निस्तेज आणि निर्जीव होऊ लागतात. अशा परिस्थितीत रोज मेथीदाणे खाल्ल्यास या समस्यांपासून आराम मिळतो. (फोटो : Freepik)
-
मेथीमध्ये उष्ण प्रकृती असते जी शरीराला आतून उबदार ठेवते.याशिवाय मेथीमध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील असतात जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात. (फोटो : Freepik)
-
जीवनसत्त्वे ए, सी, ई सह आवश्यक खनिजे मेथीच्या दाण्यांमध्ये आढळतात. हे सर्व घटक केस आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. चला तर याबद्दल जाणून घेऊया.(फोटो : Freepik)
-
मेथी आपली पचनसंस्था आणि पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते. मेथीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते जे आपल्या पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे.(फोटो : Freepik)
-
मेथी पाचक रसांचे स्राव वाढवते ज्यामुळे अन्न पचणे सोपे होते. त्यामुळे अॅसिडिटी, गॅस आणि अपचनाची समस्याही कमी होते.(फोटो : Freepik)
-
मेथीमुळे केस मजबूत होतात आणि ते तुटण्यापासून वाचतात.मेथीमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, झिंक, मॅग्नेशियम आणि प्रोटीन यांसारखे अनेक पोषक घटक असतात जे केसांसाठी खूप फायदेशीर असतात. (फोटो : Freepik)
-
केस आतून निरोगी आणि मजबूत बनवतात. मेथीच्या रोजच्या वापरामुळे केस गळणे आणि कोंडा यासारख्या केसांशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. आणि नवीन केस वाढण्यास मदत होते.(फोटो : Freepik)
-
मेथीच्या दाण्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास कमी करण्यास मदत करते. (फोटो : Freepik)

‘या’ भयंकर आजारानं शिरीष गवसचा मृत्यू; सुरुवातीलाच दिसतात ६ जीवघेणी लक्षणे, दुर्लक्ष न करता लगेच जाणून घ्या